spot_img
spot_img

मणिपूर मधील घटना माणुसकीला काळिंमा फासणारी -दिपाली ससाणे श्रीरामपूर युवक काँग्रेस व श्री शक्ती ग्रुपच्या वतीने निषेध

 श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- मणिपूर मधील घटना अतिशय अमानवीय व दुर्दैवी असल्याचे महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस दिपालीताई ससाणे यांनी म्हटले आहे. श्रीरामपूर युवक काँग्रेस व श्री शक्ती ग्रुपच्या वतीने मणिपूर मधील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी सौ. ससाणे बोलत होत्या.
ससाणे पुढे म्हणाल्या की मणिपूर मधील महिलांचे कपडे काढून त्यांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. यावेळी त्या महिलांसोबत घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी व माणुसकीला काळिंमा फासणारा असून संपूर्ण जगाने या घटनेचा निषेध केला आहे. असे असतानाही भाजपा शासित केंद्र शासनाने अद्यापही या घटनेची साधी दखलही घेतलेली नाही. त्यामुळे सरकार जरी गप्प असले तरी सर्वसामान्य जनता मात्र गप्प राहणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना मानाचे स्थान असून मणिपूर मधील घटनेला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांवर तात्काळ कारवाही करून शिक्षा व्हावी.
अशी मागणी श्रीरामपूर युवक कांग्रेस व श्री शक्ती ग्रुपच्या वतीने करण्यात आली.
या आंदोलन प्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश चव्हाणके,उपाध्यक्ष शाहरूख शेख, विद्यार्थ्यी काँग्रेसचे शहराध्यक्ष सनी मंडलिक, अमोल शेटे, तालुका सरचिटणीस गोपाल भोसले, विशाल साळवे, प्रशांत आल्हाट, कल्पेश पाटणी, तीर्थराज नवले, जियान पठाण त्याचबरोबर श्रीशक्ती ग्रुपच्या अध्यक्षा माधुरीताई सोनवणे,उपाध्यक्षा राजश्रीताई वैद्य,भारतीताई रासकर,ज्योत्स्नाताई रांका,प्रियाताई पवार,माधुरीताई कोकाटे,कल्पनाताई पापडिया आदी श्रीशक्ती ग्रुपच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!