लोणी दि.२४( जनताआवाज
वृत्तसेवा ):-सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे “राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धातमध्ये लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणी च्या इ.१०वी च्या विद्यार्थिनी कु. ध्रुवा बेंद्रे आणि कु.आर्या लोखंडे यांनी नेत्र दीपक यश संपादन केले.अशी माहीती प्राचार्या भारती देशमुख यांनी दिली.
लोकमान्य टिळक जयंती निमित्त घेण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातील ४३ शाळेतील ८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कु.आर्या प्रसाद लोखंडे हिने गट ‘ अ’ मधील ‘संस्कारे घडतो माणूस ‘व कु. ध्रुवा राहुल बेंद्रे हिने गट ‘ब ‘मधील ‘हेचि दान देगा देवा ‘या विषयावर अत्यंत प्रभावी शब्दात वक्तृत्व सादर करून विद्यालयाच्या संघासाठी दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम रुपये पाच हजार ,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.असे बक्षीसांचे स्वरुप होते.
विद्यार्थींना सौ. मनिषा गायकर मनिषा , सौ. विजया वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्याचे महसूल मंञी आणि संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी म अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषद माजी अध्यक्षा माजी सौ. शालिनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील ,अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे अतांञिकचे संचालक प्राचार्य डॉ प्रदीप दिघे, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे,शिक्षण समन्वयक प्रा.नंदकुमार दळे आदींनी अभिनंदन केले आहे.



