छत्रपती संभाजीनगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडचे माजी आमदार तथा BRS चे नेते हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
BRS चे नेते हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका
ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी नवी दिल्ली स्थित त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने नवी दिल्ली येथील आर एम एल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृती बद्दल अद्याप कुठलीही माहिती उपलब्ध नाही आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची ते जावई आहेत.



