नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):– नेवासा येथील पोलीस स्टेशन च्या प्रांगणातील श्री दत्तात्रय मंदिरातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती.
गणेश विसर्जनाच्या पुर्व संधेला आपल्या लाडक्या दैवत असलेल्या श्री गणेशाची पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या हस्ते आरती करण्यात येवुन गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’ चा जयघोष करीत उत्साहात प्रवरासंगम येथील बॅड पथका सह सवाद्य मिरवणूक काढण्यात येवुन बॅड बाजाच्या ठेक्यावर ताल धरत नेवासा पोलिस ठाण्याचे कर्मचारी थिरकले.
एरवी प्रत्येक सण-उत्सवात, तसेच गणेशोत्सवातही चोवीस तास ‘ऑनड्युटी’ असणारे पोलिस कर्मचारी आपले कुटुंब विसरून गणेशभक्तांचे रक्षण करीत असतात. त्यामुळे त्यांना कुटुंबासोबत उत्सव साजरा करता येत नाही. मात्र नेवासा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी विसर्जनावेळी भक्ती गीतांवर मनमुराद ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला दर वर्षीप्रमाणे यंदाही येथे श्री गणेशाची स्थापना करण्यातआली होती. दहाव्या दिवशी पोलिसांना सर्वत्र बंदोबस्त असल्याने नवव्या दिवशीच पोलिस ठाण्यातील गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते.
बॅड पथका सह सवाद्य शहरातून मिरवणूक काढण्यात येवुन श्री गणपती घाटावरील प्रवरा नदी पात्रात गणपती विसर्जन करण्यात आले.
या मिरवणुकीत पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे संदिप ढाकणे, सुनील जरे , सुमित करंजकर ,अशोक लिपणे,किरण गायकवाड, अरुण गांगुडे, वासुदेव डमाळे, अरविंद वैद्य गणेश फाटक अप्पासाहेब तांबे अशोक कुदळे रामचंद्र वैद्य शकील शेख शशी चक्रनारायण आदी कर्मचारी सहभागी झाले होते.