spot_img
spot_img

संजीवनी अकॅडमीची राष्ट्रीय ॲथलेटिक्स   स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई -डॉ. मनाली कोल्हे दर्जेदार शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विजयी घौडदौड सुरू

कोपरगांव( जनता आवाज वृत्तसेवा ):- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट संचलित संजीवनी अकॅडमीच्या तीन क्रीडापटूंनी ‘युथ गेम कौन्सिल ऑफ इंडिया’ ने हरियाणा मधिल सिंगु बॉर्डर येथे घेतलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ॲथलेटिक्स  चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत चार सुवर्ण पदकांची कमाई करून संजीवनी अकॅडमीच्या शिरेपेचात अधिकचा एक मानाचा तुरा खोवुन देशाच्या क्रीडा पटलावर संजीवनी अकॅडमीचे नाव कोरले आहे, अशी संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की संजीवनीच्या अथलेटिक्स व क्रीडापटू   जिल्हा, विभागीय व राज्य पातळीवरील स्पर्धांमधुन मुसंडी मारत थेट राष्ट्रीय पातळीवर विजयी झेंडा फडकविला. यात १७ वर्षांखालील खालिल वयोगटात सागर संजय आहेर याने भाला फेक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. १४ वर्षांखालील वयोगटात शशांक किशोर गवळी याने थाळी फेक व गोळा फेक स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण पदके मिळविली तर याच वयोगटात स्नेहल अशोक चौधरी हीने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळविले. या सर्वांना क्रीडा शिक्षक क विरूपक्ष रेड्डी व राहुल सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धांसाठी प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी प्रत्येक राज्यातुन दोन ते तीन स्पर्धक आले होते. अशा अटीतटीच्या स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमीने सहभाग नोंदवुन चार सुवर्ण पदकांची कमाई केली. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या संकल्पनेतील बहुआयामी विध्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने व उद्याचा सुजाण नागरीक बनविण्याच्या दृष्टीने संजीवनी अकॅडमीचे प्रयत्न अखंड चालु असतात. या प्रयत्नांसाठी पालकांचेही मोठे सहकार्य मिळत आहे. या सर्व प्रयत्नांमुळेच संजीवनी अकॅडमीचे विध्यार्थी सर्वच क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करत संजीवनी अकॅडमीच्या वैभवात भर घालित आहे, असे डॉ. कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचे व त्यांच्या पालकांचेही अभिनंदन केले. डॉ. मनाली कोल्हे यांनी सुवर्ण पदक विजेत्यांचे व त्यांच्या पालकांचे छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन, प्राचार्या शैला दुबे, उपप्राचार्या प्रिती राय, हेडमिस्ट्रेस रेखा साळुंके उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!