श्रीरामपूर (जनता आवाज
वृत्तसेवा ):- हरेगाव मोहरम सणाच्या पार्शभूमीवर श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन व सी आर पी एफ जवान यांचा एकत्रित रूट मार्च
राकेश ओला पोलीस अधीक्षक (अ.नगर), अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर (श्रीरामपूर) , नुतन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे , श्रीरामपूर तालुका पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली आज हरेगाव येथे रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते. मोहरम सण शांततेत व मोठ्या उत्सवात साजरा व्हावा तसेच शहरात जातिय सलोखा कसा अबाधित राहील या बरोबरच शहरात भाईचारा आणी शांतता टिकून रहावी व कायदा व सुव्यवस्था आबादीत राहावी या करिता या रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी, सीआरपीएफचे जवान व पी एस आय अतुल बोरसे, पी एस आय संजय निकम, पी एस आय शिंदे सहाय्यक फौजदार हबीब, पोलीस हे. कॉन्स्टेबल बर्डे नवनाथ, पोलीस हे.कॉ बाबर, पोलीस नाईक लोढे, पोलीस नाईक रणनवरे, पोलीस कॉन्स्टेबल वाबळे, असे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन चे अधिकारी ,कर्मचारी व आर आर पी एफ चे जवान यांनी मिळून हरेगाव तालुका श्रीरामपूर येथे मोहरम सणाचे अनुषंगाने रूट मार्च घेतला.



