spot_img
spot_img

कोल्हार-बाभळेश्वर रोडच्या दरम्यान अपघात या अपघातामध्ये लोणी खुर्द येथील दोन युवक जागीच ठार, लोणी परिसरामध्ये हळहळ व्यक्त

 कोल्हार (जनता आज वृत्तसेवा) :-राहाता तालुक्यातील कोल्हार येथील नगर मनमाड महामार्गावरील हॉटेल मेजवानी समोर दुचाकी क्रमांक MH. १७  बीपी . ८७५०  व मालवाहतूक ट्रक क्रमांक टी एन . ५२  एफ . २५२०  यांचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला .
या अपघातामध्ये लोणी खुर्द येथील दोन युवक जागीच ठार झाले. या अपघातामध्ये संतोष नाना पारखे (वय ३९)  व सचिन आबासाहेब खराड( वय ३७ ) या तरुण युवकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतांना शवविच्छेदनासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वरील अपघाताच्या घटनेने लोणी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!