spot_img
spot_img

वैजापूर येथे बेकायदा वाळुचा ट्रक पकडला तहसिलदारांची कारवाई

 वैजापूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-तहसिलदार सुनिल सावंत यांनी तालुक्यातील धोंदलगाव राहेगाव रस्त्यावर दोन ब्रास वाळुची बेकायदा वाहतुक करणारा टिप्पर ट्रक पकडला.‌ ही कारवाई महसुलच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री केली. हा टिप्पर (क्रमांक एमएच २० जीसी ३२२६) गणेश आघाडे यांचा असुन चालक नवनाथ वाणी (राहणार भायगाव गंगा) या वाहनातुन रॉयल्टी न भरता दोन ब्रास वाळुची वाहतूक करत होता. चालकाला परवान्याबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचे त्याने तहसिलदरांना सांगितले.
विना परवाना वाळुची वाहतूक केल्याने हे वाहन पुढील कार्यवाहीपर्यंत पोलिस स्टेशन, वैजापूर येथे अटकाव करुन ठेवले आहे. राहेगाव धोंदलगाव परिसरात अवैध वाळुची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार सुनिल‌ सावंत, तलाठी विक्रम वरपे, सुरक्षा रक्षक एस.पठाण यांनी मध्यरात्रीच्या सुमारास छुप्या रस्त्याने परिसरात पोहचुन ही कार्यवाही केली. दोन दिवसांपुर्वी तहसिलदारांनी नागमठाण परिसरात तीन ब्रास वाळुची बेकायदा वाहतुक करणाऱ्या टिप्परवर कार्यवाही करुन हे टिप्पर विरगाव पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले.
ही कार्यवाही त्यांनी दुचाकीवर केली होती. तहसिलदारांच्या या धडक कार्यवाहीमुळे वाळुची बेकायदा वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!