लोणी दि.२९( जनता आवाज वृत्तसेवा ):-अनेक व्यक्तींच्या समर्पित सेवेमुळे प्रवरा परीसरात विकासाची मंदीर उभी राहीली.लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीने साकार झालेला विकास प्रत्येकासाठी वैभव ठरले असल्याचे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले
प्रवरा अभिमत विद्यापीठाचा २०वा वर्धापन दिनाच्या निमिताने संस्थेच्या वाटचालीत योगदान देणारे डॉ नानासाहेब म्हस्के पाटील माजी प्राचार्य डॉ के.राजू यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.तसेच संस्थेच्या वाटचालीत योगदान देणारे अधिकारी कर्मचारी तसेच संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य सागर वैद्य डॉ संदीप पालवे माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील कुलगुरू डॉ व्ही एन मगरे विश्वस्त सौ सुवर्णा विखे डॉ भास्करारव खर्डे कैलास तांबे एम एम पुलाटे ध्रृव विखे पाटील आदी उपस्थित होते.
डॉ नानासाहेब शिंदे आणि डॉ के.राजू यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की खासदार साहेबांनी ग्रामीण रुग्णालय सुरू केले तेव्हा अनेकांनी शंका उपस्थित केल्या.पण या रुग्णालया करीता त्यांनी आशी माणस शोधून आणली की या व्यक्तींच्या अपार कष्टाने रूग्णालयचा नावलौकीक वाढला.पायाचा दगड बनलेल्या आशा व्यक्तिमुळे ही विकासाची मंदीर उभी राहीली असल्याचे त्यांनी सांगितले.
आज या भागात शिक्षण आणि आरोग्याचे मोठे काम उभे राहीले यामागे खासदार साहेबांची दूरदृष्टी होती.ते पाच वर्षाचा पुढचा विचार करीत असत त्यातूनच आरोग्य सेवेतील आधुनिक सुविधा इथे निर्माण झाल्या डॉ म्हस्के यांच्या सारखी व्यक्तीमहत्व कोणाताही स्वार्थ मनामध्ये न ठेवता या कार्यामध्ये समरस झाल्यामुळे प्रवरा मेडीकल ट्रस्टचा नावलौकीक आता जगाच्या कानाकोपर्यात जावून पोहचला असल्याचा अभिमान असल्याचे विखे पाटील म्हणाले.
यावेळी बोलतांना सागर वैद्य यांनी प्रवरा परिसराचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासात भर घालणार असल्याचे सांगत नवीन शिक्षण धोरण राबवण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन केले
यावेळी बोलतांना विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी संस्थेची प्रगती ही शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांच्या कार्यावर अवलंबून असून आपल्या कार्यामुळे प्रवरा मेडिकल ट्रस्ट नव्या उंचीवर जात आहे यामुळे यंदा दोन इन्क्रिमेंट पगारा वाढीत देत असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. तर नामदार साहेबच्या सहकार्याबद्दल त्यांनीयावेळी आभार मानले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ व्ही एम मगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ अरुणकुमार व्यास यांनी केले