लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):- राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवीचंद भारत तांबे ( वय ६३ ) यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले.
देवीचंद तांबे हे नामदार विखे पाटील अत्यंत विश्वासू सहकारी होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण प्रवरा परिसर व दाढ बुद्रुक परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांनी आपले राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक पदावर ती काम करीत असताना कुठलाही राजकीय द्वेष न ठेवता सर्वसामान्य मध्ये हक्काचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. मुळा प्रवरा वीज संस्थेची संचालक, विखे पाटील कारखान्याचे सलग १५ वर्षे संचालक आधीसह विविध संस्थेवर त्यांनी काम पाहिले आहे. मनमिळावू, सतत हसमुख सर्वांना आपला वाटणारा असा त्यांचा परिचय होता. गेले काही दिवसापूर्वी चेन्नई येथे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती यशस्वी पण झाली होती ( आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. मोहम्मद रेला यांनी त्याची शस्त्रक्रिया केली होती ) परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
त्यांची निधनाची वार्ता कळताच संपूर्ण दाढ परिसरानी बंद ठेवून ग्रामस्थांनी श्रद्धांजली पर शोकाकुल वातावरणात जड अंतकरणाने आपल्या हक्काच्या माणसाला निरोप दिला.
यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे , जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, संगमनेर नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, विखे कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांच्या सह राहाता तालुक्यातील विविध पदाधिकारी, दाढ व आसपास परिसर तील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय हिंद ट्रेडर्सचे संचालक सुनील तांबे व प्रगतशील शेतकरी अनिल तांबे यांचे ते थोरले बंधू होते. देवीचंद तांबे यांच्या जाण्याने प्रवरा परिसरामध्ये विखे परिवाराचा हक्काचा व हाडाचा कार्यकर्ता गेला