अहमदनगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य श्री सुदर्शन पोकळे, श्री धनंजय आहेर आणि श्री एकनाथ मुंगसे यांनी पोल्ट्री फार्मर्स संघटना महाराष्ट्राच्या वतीने मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मंत्री (महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास) महाराष्ट्र राज्य. यांची भेट घेऊन पोल्ट्री शेतीपूरक बांधकामावरील कर रद्द करान्यात यावा यसाठीचे निवेदन देण्यात आले. तसेच पोल्ट्री संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शेतीपूरक व्यवसायाला करपट्टीही नसावी. शेतातील बांधकाम ग्रामपंचायतीसाठी करपात्र नसल्याचा एक ऐतिहासिक निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. व पोल्ट्री व्यवसायासाठी असणारे वीज बिल हे कृषिपंपाच्या दराने उपलब्ध करून देण्यासाठीचा याबाबतचा पाठपुरवठा पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वतः करत असल्याचे सांगितले व लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी पोल्ट्री धारकांना दिले. तसेच विखे पाटील साहेबांनी महाराष्ट्र राज्यात लवकरच NECC धरतीवर पर्यायी व्यवस्था म्हणून महाराष्ट्र राज्य अंडी समन्वय समितीची (MECC) ची स्थापन करण्यासाठी लागणारे अधिनियम तयार करण्यास कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य व संबंधित आधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
पोल्ट्रीधारकांसाठी शासनामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी शासनामार्फत पोल्ट्रीधारकांची संख्या व त्यांचा तपशील यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, शासनाच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी सर्व पोल्ट्री शेडची माहिती संकलित करण्याचे आव्हान सर्व पोल्ट्री धारकांना केले.
तसेच संगमनेरमध्ये झालेल्या तालुकास्तरीय कुक्कुट शाळेचे व त्यासाठी पोल्ट्रीधारकांनी दिलेला प्रतिसाद बघून त्यांनी कौतुक केले. व राज्यात पशुसंवर्धन विभागामार्फत तालुकस्तरावर अश्या प्रकारच्या कुक्कुट शाळा आयोजन करून शासनामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व पोल्ट्री विषयी जागरूकता केली जाईल. शेवटी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य श्री सुदर्शन पोकळे, श्री धनंजय आहेर आणि श्री एकनाथ मुंगसे, श्री ऋषिकेश खांदे उपस्थित पोल्ट्री व पोल्ट्री फार्मर्स संघटना महाराष्ट्राच्या वतीने मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मंत्री (महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास) महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करण्यात आला.