लोणी दि.३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यास आणि कष्टाशिवाय पर्याय नसून आपण या महाविद्यालयात प्रवेश घेतला या संधीचे आपण सोने करून आपले उद्दिष्ट साध्य करावे असे प्रतिपादन लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ यांनी केले.
लोणी येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणी येथे आयोजित पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी व्यासपीठावर फार्मसी इन्स्टिट्यूशनचे डाॅ. बी. एम. पाटील , प्राचार्य डॉ. आर. एस. जाधव ,प्रा. डी बी थोरात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम समन्वयक प्रा. अर्चना कदम यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्रा. समृद्धी पाटील यांनी केले