16.3 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

वेळीच आरक्षण न दिल्यास राज्यभर आंदोलने करु – सकल धनगर समाजाचा सरकारला इशारा नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात एक तास रस्ता रोको

नेवासा फाटा ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- धनगर आरक्षणासाठी सरकार केवळ अश्वासने देत आहेत माञ ठोस भूमिका घेतली जात नाही या अनुषंगाने धनगर समाज बांधव पुन्हा एकदा आक्रमक होऊन शनिवार (दि.३०) रोजी सकाळी ११ वाजता छञपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपस्थित आंदोलकांनी राज्य सरकारलाच एक प्रकारे आव्हाण उभे करत आरक्षण वेळेत दिले नाहीतर तर रक्तपात होईल आरक्षणाला विरोध करणाऱ्या सरकारला जागा दाखवू व संपुर्ण राज्यभर आंदोलन करु अशा भाषेत धनगर समाजाच्या नेत्यांनी या रस्ता रोको प्रसंगी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत गर्भित इशारा दिला धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेना व इतर संघटनांनी मोर्चे काढले आंदोलने केली सरकारचे लक्ष वेधले असे असतानांही सरकारने केवळ समाज बांधवाना अाश्वासनांची खिरापत दिली सरकारने केवळ अश्वासने दिले आता भाजप-सेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेत आलेले आहे सरकारच्या अनेक कॅबिनेट बैठका झालेल्या आहेत माञ ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या अन्यथा राज्यभर आंदोलन करु असा गर्भित इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला

या रस्ता रोको आंदोलनाला सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालेला होता येळकोट..यळकोट जयमल्हारच्या घोषणा देत “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे” अशा घोषणा देत रस्ता रोको करण्यात आला यावेळी आंदोलकांचे निवेदन नेवासा तहसिलदारांना देण्यात आले नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे व सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुरेश शिंदे पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

नेवासा फाटा येथील अहिल्याबाई होळकर चौकात राजमाता अहिल्याबाईंना अभिवादन करुन सकल धनगर समाज वाजत – गाजत राजमुद्रा चौकात येऊन सरकारला रस्ता रोकोप्रसंगी गर्भित इशारे देत असतांनाही आंदोलन शांततेत पार पाडले यावेळी मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेला होता.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!