19.1 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

गणपती विसर्जनावेळी नदीत बुडणाऱ्या मुलाला वाचवले

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-उक्कलगाव (तालुका श्रीरामपुर) येथील इयत्ता नववीत शिकणारा मुलगा गणेश विसर्जन करत असताना प्रवरा नदीत बुडू लागला मात्र त्याच्यासोबत असणाऱ्या इतर मुलांनी तप्तरता दाखविल्यामुळे या मुलाचे प्राण वाचवण्यात यश आले.कृष्णा सुभाष थोरात असे या मुलाचे नाव आहे. गणेशोत्सवाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत असताना तालुक्यातील उक्कलगाव येथील कृष्णा सुभाष थोरात हा गणपती बुडविण्यासाठी प्रवरा नदीत गेला होता.सांयकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान प्रवरानदी वाकणवस्ती येथे ही घटना घडली .प्रवरानदीत वाहते पाणी आहे.न्यू ईंग्लिश स्कुल येथील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारा कृष्णा हा गणपती बुडवत असताना त्यास खोल खड्ड्याचा अंदाज आला नाही.

पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे तो वाहून गेला.त्यांच्या सोबतीला असलेल्या दुसऱ्या एका मुलाने मदतीसाठी आरोडाओरडा केल्याने अनेक तरुणांनी नदीपात्राकडे धाव घेऊन नदीत उड्या मारल्या.तोपर्यंत प्रवाहाने विद्यार्थी वाहून गेला होता.त्यावेळी इतर तरुणांनी पोहून काही अंतरावर त्यास पकडले.त्याला बाहेर काढत पोटातील पाणी बाहेर काढले.श्रीरामपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.या वेळी प्रवरानदीत मोठी गर्दी जमली होती.घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावभर पसरली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!