spot_img
spot_img

मणिपूर येथील अत्याचाराचा श्रीरामपूरात सर्वपक्षीय निषेध

 श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर मणिपूर येथील हिंसा व महिलांची नग्न धिंड काढून सामूहिक बलात्कार करण्यात आले त्या घटनेचा रिपाई राष्ट्रवादी शिवसेना भीमशक्ती काँग्रेस जनसेवा पार्टी आम आदमी पार्टी वंचित आघाडीलहुजी सेना समाजवादी पार्टी लाल निशाण पक्ष भारत मुक्ती मोर्चा मर्चंट असोसिएशन विविध संघटना सर्व पक्षीय चे वतीने महात्मा गांधी पुतळ्याजवळ दुपारी एक वाजता तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून मणिपूर  सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात येऊन निषेधाचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय विठ्ठल पाटील यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की मणिपूर येथील पक्षपाती व अकार्यक्षम मुख्यमंत्री ए. बिरेन सिंग यांचे सरकार त्वरित बरखास्त करून मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा.
महिलांचे संरक्षण करण्याऐवजी पोलिसांनी त्या दोन महिलेला 

 जमावाच्या स्वाधीन केले त्या पोलिसांना सह आरोपी करा त्या महिलेची नग्न दिंड काढणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करून फाशी शिक्षा द्या मणिपूर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्रीय संरक्षण दलास सर्वाधिकार द्यावेत अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.
त्यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीच्या नेत्या अनुराधाताई अधिक काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक भिम शक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर लाल निशान लाल जीवन सुरवडे शिवसेनेचे उबाठा सचिन बडदे आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष तिलक दूंगरवाल वंचितआघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन रिपाईउत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमाताई धीवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकीशेठी कामगार नेते नागेश सावंत समाजवादी पार्टीचे जोयेफ जमादार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल सचिव हनीफ पठाण काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर मुरकुटे रिपाईचे तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ मा. नगरसेवक मुक्तार भाई शहा संविधान बचाव समितीचे अहमद जहागीरदार ऍड. रावसाहेब मोहन पास्टर रावसाहेब त्रिभुवन राजेश कर्डक आदी प्रमुख नेत्यांनी निषेधपर भाषण केले.
त्यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मुथा उपाध्यक्ष प्रेमचंद कुंकूलोळ राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे तेजस गायकवाड बामसेफचे सुरेश चौदंते रिपाईचे सिद्धार्थ सगळगीले ख्रिस्ती समाजाचे नेते दीपक कदम सुरेश ठुबे रिपाईचे राजेंद्र मगर प्रदीप कदमअंतोन शेळके वंचित आघाडीचे सुमेध  पडवळ किशोर ठोकळ संतोष त्रिभुवन युवा सेनेचे निखिल पवार लहुजी सेनेचे रईस शेख किशोर बकाल हमीद चौधरी एड.मिलिंद धीवर मनोज भिसे गोपाल वायंदेशकर अनिल इंगळे आकाश त्रिभुवन प्रवीण गायकवाड यासीन सय्यद एजाज दारूवाला अमोल मिसाळ साजिद मिर्झा आदित्य अधिक किशोर फाजगे शंकर कोरडोल अहमद शहा विनीत दुंगरवल अर्जुन शेजवळ योगेश ससाणे   गौतम डोंगरे एड. आर डी भोसले भाऊसाहेब सिंग अविनाश पोहेकर तसेच महिला आघाडीच्या जयश्री जगताप उज्वला येवलेकर पुनम जाधव प्रियंका जनरेजा भाग्यश्री भामरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्र संचालन सुभाष त्रिभुवन यांनी केले तर आभार संदीप मगर यांनी मानले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!