spot_img
spot_img

पाटणी विद्यालयाच्या स्वामिनी जेजुरकर ला जिल्हास्तरीय शूटिंग स्पर्धेत गोल्ड मेडल

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ) :येथील शां.ज. पाटणी विद्यालयाची स्वामिनी जेजुरकर हिने त्रिमूर्ती विद्यालय नेवासा फाटा येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हास्तरीय शूटिंग स्पर्धेत अचूक नेम साधत एअर पिस्तोल या प्रकारात गोल्ड मेडल मिळून विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

त्याबद्दल हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, विद्यालयाचे चेअरमन भरत कुंकूलोळ, मुख्याध्यापक विठ्ठल भांगरे, पर्यवेक्षिका मंगला डोळस आदींनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत या स्पर्धेसाठी तिला अहमदनगर शूटिंग क्लबचे ऋषी दरंदले, त्रिमूर्ती विद्यालयाचे छुबुराव काळे, पाटणी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक बाबासाहेब औटी व उर्मिला पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!