टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- माजी आमदार व अशोक कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी अशोक कारखान्याच्या वार्षिक सभेत महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर केलेले आरोप धांदात खोटे असल्याचे अशोक कारखान्याचे माजी संचालक प्रा. कार्लस साठे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात प्रा. साठे यांनी नमुद केले आहे की, दि. २५/०९ /२०२३रोजी अशोकाची वार्षीक सभा झाली या सभेत मुरकुटे यांनी नेहमीच्या पद्धतीने अहवाल, सभासदांनी विचारलेले विषयावर २०२३-२४ हंगामाच्या उस दर इ. चर्चा न करता. ना. विखे व आ. थोरात यांची मिलीभगत आहे ते एकमेकांच्या कार्य क्षेत्रातील उस न नेता अशोक व इतर कारखन्याचा ऊस नेतात एकमेका विरुद्ध निवडणूका लढवीत नाही तसेच २००५चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा तयार होताना त्यांनी विरोध केला नाही.
विशेषतः आ. थोरात हे. २००५ साली पाटबंधारे राज्यमंत्री होते त्यांनी विधान परिषदेत १७ डिसेंबर २००५ ला हे विधेयक मांडले व ते पास झाले असे मुरकुटे यांनी सांगितले. वास्तविक पाहता आ. बाळासाहेब थोरात हे २००५ ला कृषीमंत्री होते त्यांचा या कायद्याशी काही ही संबंध नाही ना. विखे यांनी व थोरात यांनी या कायद्याला विरोधच केला आहे व हे बिल दुपारी ४.३० वा मांडले – ना. विखे म्हणाले होते की ते रात्री उशिरा मंजूर झाले होते. तेव्हा ना. विखे हजर नव्हते ना. विखे व आ. थोरातांवरील केलेले आरोप हे धांदात खोटे आहेत.
मुळा प्रवरा बंद पडतांना जितका आटापिटा केला तितका या कायद्याचा वेळी का केला नाही? २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा होत असताना आपण झोपला होता का? आपण राष्ट्रवादी पक्षात होता. आपण या कायदा विरोधात मोर्च्या, धरणे, निवेदन दिले नाहीत उलट १९९९ ला आपण श्रीरामपूर मतदार संघात पराभूत झाल्यावर अशोकची पाटबंधारे खात्याला मदत करणारी यंत्रणा काढून घेतली. कारखान्यमार्फत पाणी पट्टी हमी बंद केली.
आपण पाणी विषयावर खोटा आव आणलेला आहे. मुरकुटे यांनीच – आ. थोरात व ना. विखेंशी मिलीभगत केलेली आहे. अहमदनगर जिल्हा बँकेत आ. थोरातांकडून संचालक पद मिळवले व त्यांना चेअरमनपद निवडणूकीत मदत केली नाही.
ना. विखेंबरोबर श्रीरामपूर मार्केट कमिटीत युती केली व सभापती निवडणूकीत त्यांना मदत केली नाही. तेंव्हा आपण केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. वार्षीक सभेत खोटी माहिती देऊन सभासदांची दिशाभूल केलेली आहे. संगमनेर कारखान्याने – रु २८३५- प्रवरा कारखान्याने २७०० रु २०२३-२४ साठी जाहीर केला आहे. याचा राग येऊन सभेत ना. विखे व आ.थोरातांवर मुरकुटे यांनी टीका केली आहे. त्यांनी उस दाराची तुलना- संगमनेर, प्रवराशी न करता मुळा व ज्ञानेश्वरशी केली आहे. अशोक कारखान इतर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस तेथे अशोक बँकेचे कर्ज दिलेले आहे व वसुलीसाठी ऊस आणून इतर कारखन्यांना पाठवून नफा मिळवला जातो.
वार्षीक सभेत सभासदांनी उस दर २०२३-२४ चा विचारला तसेच नेवासा भागातून उस का आणता? संचित तोटा का वाढला? कोळपेवाडी संजीवनी भाव ज्यादा देतात अशोक कारखाना का? देत नाही असे विचारले आसता मुरकुटे यांनी त्यांच्याकडे दारूचे कारखाने आहेत त्यामुळे ते जादा भाव देत असल्याचे सांगितले. अशोक कारखान्याकडे इथेनॉल, को जनरेशन आहे पण जादा भाव दिला जात नाही. जादा दर देण्याची मानसिकता पाहिजे. तेव्हा मुरकुटे यांनी नेहमी प्रमाणे अशोकवर न बोलता ना. विखे व आ. थोरातांवर पाटपाणी विषयावर खोटे नाटे बोलून तोंडसुख घेतले असल्याचे प्रा. कार्लस साठे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.