कोपरगाव(जनता आवाज वृत्तसेवा ):-कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वारी, जय बाबाजी भक्त परिवार, वारी व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने एक तास स्वच्छतेचा या अभियानांतर्गत रविवारी दिनांक १ ला सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियानाचा ८२ वा. सप्ताह यशस्वीपणे राबविण्यात आला.
या अभियानात वारीतील स्मशानभूमी, गोदावरी पूल, जय बाबाजी मंदिर परिसर व कान्हेगाव रेल्वेस्थानक परिसरात संकलित केलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या, पेटवून दिल्या. विशेष करून यावेळी स्वच्छता दूत मधुकरराव टेके यांनी या अभियानासाठी आपला ट्रॅक्टर व ट्रेलर मोफत दिल्याने गोदावरी नदीपात्राच्याकडेला विसर्जित केलेल्या एक ट्रेलरभर गणेशमूर्ती उचलून पुन्हा गोदावरी नदी पात्रात मधोमध नेऊन विसर्जित केल्या.
या स्वच्छता अभियानात सरपंच सतीशराव कानडे स्वच्छतादूत मधुकरराव टेके, बाजार समितीचे माजी सभापती सुरेशभाऊ जाधव सेवानिवृत बँक अधिकारी रावसाहेब जगताप, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधव, भाऊसाहेब टेके, सेतू कार्यालयाचे संचालक रविंद्र टेके, चंद्रकांत कवडे, पत्रकार रोहित टेके, पोस्ट मास्तर संजय कवाडे, पंडित लकारे, विलास गाडेकर, गोरख जठार, ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, सतीश गायकवाड, मनोज जगधने तसेच कान्हेगाव रेल्वे स्टेशनचे अधिक्षक सी. बी. शर्मा साहेब, रौशन पटेल, नितीश कुमार, काॅम्रेड महेंद्र गडकरी, काॅम्रेड दिनेश चावडे, गणेश अबक, अस्लम तडवी, अभियंता ज्ञानेश्वर देशमुख, काॅम्रेड पिंटू कुमार, बाबासाहेब गायकवाड, धर्मेंद्र कुमार, सुनील कुमार, प्रिती ब्रिजमोहन, आशिष मडावी, महेश चलाख, बंडू तिमाजी, कांचन पंडीत, योगेश झाल्टे, अनिताताई झाल्टे, मंदाताई पांडव यांच्यासह ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या या अभियानात आपले श्रमरुपी योगदान दिले.