लोणी दि.२२( जनता आवाज
वृत्तसेवा ):-ग्रामीण दंत महाविदयालय लोणी, ओरल मॅक्सिलोफेशिअल सर्जरी विभाग व भारतीय ओरल मॅक्सिलोफेशिअल सर्जन यांच्या संघटनेच्या संयुक्त विदयमाने प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ, लोणी येथे तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद “२६ मीड टर्म कॉन्फरन्स ॲन्ड १२ पी.जी. कन्वेशन ऑफ AOMSI- 2023″ आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचा उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी विश्वस्त ध्रुव विखे पाटील, कुलगुरु डॉ. व्ही. एन. मगरे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास बुप्पर, संघटनेचे जनरल सेकटरी डॉ. गिरीश राव, संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. मंजुनाथ राय, प्राचार्य डॉ. रवींद्र मणेरीकर, विभागप्रमुख आणि ऑरगनायझींग चेअरमन डॉ. सीमित शहा व ऑरगनायझींग सेक्रेटरी डॉ. अनुज धदीझ, सायटिफीक चेअरमन डॉ. हरीष सलुजा व ट्रेझरर डॉ. पुलकीत खांडेलवाल हे उपस्थित होते.
दंत वैदयकीय क्षेत्रात संशोधनाकरिता मोठा वाव असुन दंत क्षेत्रात काम करत असणान्या सर्वानी संशोधनाकडे संधी म्हणून बघावे व त्याचा फायदा रुग्णांना तसेच विदयार्थीना करुन दयावा असे कुलगुरु डॉ. मगरे यांनी आवाहन केले. ग्रामीण दंत महाविदयालय लोणी यांनी संशोधन क्षेत्रात मोठया प्रमाणात कार्य केले असुन दंत महाविदयालयाचे मागील २ वर्षात ७० ते ८० पेटंट प्रसिद्ध झाले असुन केंद्र शासनाने त्यास मान्यता दिलेली आहे. दंत महाविदयालयाने संशोधन क्षेत्रात केलेले कार्य निश्चितच कौतुकास पात्र असुन संशोधनाचा फायदा विदयार्थीनबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांला झाला असल्याचे त्यांनी नमुद केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास धुप्पर, संघटनेचे सेकेटरी डॉ. गिरीष राव, संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. मंजुनाथ राय, प्राचार्य डॉ. रविंद्र मणेरीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या परिषदेकरीता देशभरातुन ८५० दंत वैदयक क्षेत्रातील प्रतिनिधीनी नोंदणी केलेली आहे. या परिषदेत ३०० पेपर तसेच १५० पोस्टरची नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच या परिषदेत ९ कार्यशाळा आयोजीत केलेल्या असुन या परिषदेत जिभेच्या कर्करोगाची, जबडयाची शस्त्रक्रिया, दिढ वर्षांच्या मुलाच्या टाळुची शस्त्रक्रिया, तसेच कृत्रीम जबडा बसविण्याची शस्त्रक्रिया कृत्रीम कान बसविण्याची शस्त्रक्रिया, विनामोबदला तंज्ञाकडुन परिषदेच्या आगोदर करण्यात आल्या व याचा फायदा रुग्णांबरोबर दंत क्षेत्रात कार्यरत असलेल्या विदयार्थीना झालेला आहे.
या परिषदेत दंत कार्यशाळेबरोबरच आलेल्या प्रतिनिधीकरीता क्रिकेट, फुटबॉल, डॉलीबॉल, ऍथलेटिक्स, बुध्दिबळ, कॅरम, बॅटमिंटन, टेबलटेनिस अशा विविध स्पर्धाचे आयोजन परिषदेच्या आगोदर करण्यात आलेल्या होते.
या परिषदेत दंत क्षेत्रातील एकुण १०० तज्ञ मार्गदर्शन करणार असुन दंत क्षेत्रात कार्य करत असताना पाळावयाचे नैतीक मुल्य तसेच दंत क्षेत्रातील नवनविन तंत्रज्ञान या माध्यमातून विद्यार्थ्यांना व दंत क्षेत्रात काम करत असणान्या प्रतिनिधींना अवगत होणार आहेत.
या परिषदेत विद्यार्थ्यांकरीता प्रात्याक्षिक स्पर्धाही आयोजीत करण्यात आलेल्या आहेत याचा फायदाही विद्यार्थ्यांना होणार आहे.
या परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरीता डॉ. अमीत मणी, डॉ. शुभांगी मणी, डॉ. हरीष सलुजा, डॉ. पुलकीत खांडेलवाल, डॉ. अस्मिता लाडे, डॉ. मोनल कारकर, डॉ. तन्वी सांसगिरी यांनी विशेष मेहनत घेतली. डॉ. सिमीत शहा यांनी प्रस्ताविक केले तसेच डॉ. राहुल पाटील व डॉ. तन्वी सांसगिरी यांनी सुत्रसंचालन केले तसेच डॉ. अनुज धदिश यांनी आभार व्यक्त केले.



