लोणी दि.१( जनता आवाज वृत्तसेवा):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एस एम बी एस टी महाविद्यालय संगमनेर येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेमध्ये प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने सांघिक उपविजेतेपद पटकावले अशी माहीती प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने यांनी दिली.
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघातील आदिती काळे, दिपाली इष्टके, मंजुश्री नरोडे, वैष्णवी पठारे, साक्षी उडान, वेदिका खर्डे, ज्ञानदा काळे, प्रतीक्षा हारदे, सायली कडू ऋतुजा कुऱ्हाडे, वेदांती येवले, दिपाली गाडेकर यांच्या संघाने उपांत्य सामन्यामध्ये संजीवनी इंजिनिअरिंग संघाला १४- ०४ च्या फरकाने पराभूत करून अंतिम सामन्यापर्यंत मजल मारून उपविजेते पद प्राप्त केले या संघाला क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे, प्रा सागर महाजन, प्रा. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
ते यश प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,खासदार सुजय विखे पाटील,संस्थेचे सहसचिव भारत घोगरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, संस्थेचे संचालक डॉ प्रदीप दिघे,शिक्षण संचालक प्रा. लीलावती सरोदे, सहशिक्षण अधिकारी प्रा. नंदकुमार दळे, संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे , ,जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ राजेंद्र देवकाते, यांनी अभिनंदन केले.




