spot_img
spot_img

शिक्षणांसोबत प्रवरेच्या माध्यमातून अभ्यासु नेतृत्वाची शिकवण-कर्नल शेखर जोशी प्रवरा सेन्ट्रल पब्लिक स्कूल विद्यार्थी प्रतिनिधी निवड

लोणी दि.२१( जनता आवाज वृत्तसेवा):-शिक्षणांसोबत प्रवरेच्या माध्यमातून अभ्यासु नेतृत्वाची शिकवण शालेय पातळीवरील विविध निवडीतून होत असते यातूनच आपला सर्वागिंण विकास होत असतो असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल कमांडंट कर्नल शेखर जोशी यांनी केले.
  

 लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा सेन्ट्रल पब्लिक स्कूल, प्रवरानगरच्या १२ व्या विद्यार्थी प्रतिनिधी समारोह प्रसंगी कर्नल शेखर जोशी बोलत होते.
यावेळी कर्नल जोशी म्हणाले, मला मनस्वी आनंद होत आहे.” “विद्यार्थी दशेत आपणास प्रतिनिधी होण्याचे भाग्य लाभले ही एक अभिमानाची गोष्ट आहे, ते या साठी की ९०० विद्यार्थाचे तुम्ही प्रतिनिधीत्व करणार आहात. आपल्या सर्वांची निवड करताना शैक्षणिक , क्रीडा, सांकृतिक, शिस्त, इतर कला कौशल्याचा विचार करण्यात आलेला आहे. हे प्रतिनिधीत्व करत असताना तुमच्या मध्ये नेतृत्व गुण विकसित होणार आहे . आज समाज्यामध्ये चांगल्या शिस्तप्रिय, अभ्यासु नेतृत्वाची गरज आहे. जेव्हा आपण आपले शिक्षण पूर्ण करून जेथे नोकरी, व्यवसाय करणार आहात त्या वेळेला शालेय जीवनात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कार्य केल्याचा नक्कीच फायदा होईल.
आपण सर्वानी प्रवरा सेन्ट्रल पब्लिक स्कूलचे नाव लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. आपण विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी या मधिल दुवा म्हणून काम पाहणार आहात. आपल्यामधिल काही प्रतिनिधीची निवड क्रीडा प्रतिनिधी , सांकृतिक प्रतिनिधी ,वस्तीगृह प्रतिनिधी आशा ज्या पदासाठी झाली आहे . हे काम पाहत असताना शाळेत विद्यार्थ्याना येणाऱ्या अडीअडचणी शिक्षकांच्या मदतीने सोडवा असे ही सांगितले.प्राचार्या डॉ. रोजमीन बेलिम आभार मानले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!