spot_img
spot_img

खुपटी जि.प प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. उज्ज्वला कार्ले, उपाध्यक्षपदी मच्छिंद्र हरिभाऊ आठरे यांची निवड

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून गणना झालेली खुपटी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी सौ. उज्ज्वला तुकाराम कार्ले यांची तर उपाध्यक्ष पदी मच्छिंद्र हरिभाऊ आठरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

मुख्याध्यापक बाबाजी सांगळे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून सौ. वैशाली विकास बहिरट, सौ.अर्चना किशोर शिंदे, सौ. कांचन किशोर बहिरट, सौ. अर्चना तुकाराम चौधरी, सौ. सविता राजेंद्र घोरपडे, योगेश रघुनाथ कार्ले, विलास भानुदास गोरे, अशोक गंगाधर माळी, तुकाराम भाऊसाहेब कापसे कापसे ,बाबासाहेब अर्जुन वरुडे यांची निवड करण्यात आली.

यावेळी चेअरमन अशोक चौधरी , व्हा. चेअरमन सुनील गव्हाणे, माजी सरपंच गोरक्षनाथ तनपुरे, माऊली कार्ले, किशोर कुऱ्हे, मा. सरपंच सुरेश कार्ले, डाॅ. विष्णु चौधरी,प्रगतीशील शेतकरी कुंडलिक गव्हाणे, भानाभाऊ चौधरी, विष्णु शिर्के, नरेंद्र नेव्हल, रामनाथ कार्ले, उद्धव पवार, प्रकाश कार्ले,ईस्माईल पठाण, जालिंदर गव्हाणे, बाबा शिंदे आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी शाळेतील शिक्षक प्रकाश काळे, सुभाष पवार ,संतोष रासकर ,अरुण शिकारे ,संतोष भांबरे ,सुरेखा भगत, ज्योती साबळे, चित्रा गायकवाड या शिक्षकांनी सहकार्य केले .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!