spot_img
spot_img

राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीच्या विद्यार्थ्यींनींच्या संघाने पटकवला प्रथम क्रमांक    विभागीय पातळीवर झाली संघाची निवड

लोणी दि.२( जनता आवाज वृत्तसेवा ):अहमदनगर जिल्हा शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान गणित अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने सेंट सेव्हियर्स हायस्कुल तारकपूर येथे झालेल्या राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था रवीनगर ,नागपूर व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार इयत्ता आठवी ते दहावीच्या गटातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय विज्ञान नाट्यस्पर्धा मानवाच्या शास्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या प्रमुख विषयांतर्गत भरड धान्य पौष्टीक आहार , आधुनिक प्रगत तंत्रज्ञान , विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर पार पडली.

या स्पर्धांचे परीक्षण प्रसिद्ध नाट्यकलाकारांच्या द्वारे करण्यात आले. त्यामध्ये प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीच्या कु सिद्धी पवने, कु. अक्षरा धावणे , कु.समीक्षा कुमकर , कु भक्ती देसाई,कु श्रेया विखे,कु श्रद्धा पारखे, कु गीतांजली काळे,कु अंजली माघाडे सह एकूण आठ विद्यार्थ्यीनींच्या गटाने उत्कृष्टपणे विज्ञानाची कास धरू विषयांतर्गत – भरड धान्य पौष्टिक आहार, त्याचे महत्व व अंधश्रद्धाळू पणा किती घातक ठरू शकतो हे पटवून देत समाजातील अज्ञानी लोकांचे वास्तविक चित्र* पटवून देत नाटिकेच्या माध्यमातून प्रत्यक्षात समोर आणले, विद्यार्थ्यीनींची सांघिक कामगिरी चांगली झाल्यामुळे या संघाला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. जिल्हास्तरावर झालेल्या नाट्योत्सव स्पर्धांमधून प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त संघ सहभागी झाले होते. त्यातून विभागीय स्पर्धेसाठी फक्त एकच संघ निवडला जाणार होता , त्यामध्ये प्रवरा कन्या मंदीर लोणीच्या मुलींच्या संघाची विभागीय पातळीवरील नाट्योत्सव स्पर्धेसाठी निवड झाली. या नाटिकेला इतर सहकलाकार नववीच्या मुलींनीच संगीताच्या माध्यमातून साथ दिली. या नाटिकेच्या निर्मात्या , संवाद , विज्ञान प्रयोग व कथा लेखिका – सोनाली मेढे , पल्लवी पवार , ज्येष्ठ विज्ञान शिक्षक अनिल लोखंडे, प्रवरा कन्या मंदीर विद्यालयाच्या प्राचार्या – सौ भारती कुमकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या घवघवीत यशाबद्दल सर्वांचे राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत पाटील घोगरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ ,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे , प्रा.नंदकुमार दळे, प्रवरा कन्या मंदिरच्या प्राचार्या – सौ भारती कुमकर , सर्व शिक्षक , शिक्षिका यांनी यशस्वी विद्यार्थ्यीनींच्या संघाचे अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!