spot_img
spot_img

राहुरीत मोतीबिंदू निदान व दंत तपासणी शिबिर संपन्न

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महिन्याच्या पहिल्या रविवारी होत असलेल्या आनंदऋषीजी नेत्रालय अ.नगर व राम रामेश्वर फाउंडेशन तसेच दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी राम डेंटल क्लिनिक राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र मोतीबिंदू निदान व दंत तपासणी शिबिर अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळा राहुरी या ठिकाणी करण्यात आले होते   

या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री संजय इघे सर राहुरी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटनेचे राहता तालुका उपअध्यक्ष किशोर टोपे हे होते यावेळी प्रमुख उपस्थिती डाॅ. चंद्रकांत गिरगुणे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे उत्तर अहमदनगर डाॅ.सचिन शेलार डॉ.शेलार मॅडम डॉक्टर महेश इघे, प्रहार चे जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी राहुरी शहर कार्याध्यक्ष संजय देवरे शहरअध्यक्षा अनामिका हरेल माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव पञकार बोल महाराष्ट्र चे गणेश भालके प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले.

यामध्ये हे शिबिर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी घेण्यात येत आहे आज पर्यंत ८४ यशस्वी शिबिर पार पडले आज पर्यंत ४७६० पेशंट वर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली सामाजिक कार्याची आवड असल्याने हे असे शिबिर घेण्यात येत आहे तरी राहुरी तालुका येथील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा डॉ सचिन शेलार यांनी नेत्र तपासणी शस्त्रक्रिया झाल्यानंतर घ्यायची काळजी सूचना आणि मार्गदर्शन केले

संजयजी इघे सर हे शिबिराचा उद्देश म्हणजे फक्त ज्येष्ठ नागरिकांची सेवा आहे आयोजन करणाऱ्या संस्थेच्या कोणताही स्वार्थ नाही उदांत सेवेतूनही काम चालू असते अशा शब्दात कौतुक करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने पेशंट उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार रवींद्र भुजाडी यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!