लोणी दि.२०( जनता आवाज वृत्तसेवा):-दैनंदिन जीवन जगत असताना आर्गुंथिक नियोजन महत्तवाचे आहे . हे नियोजन करत असताना पैशांची केवळ बचत न करता गुंतवणूक केल्यास उत्तम आर्थिक नियोजन होवू शकते आणि त्याकरिता म्युच्युअल फंड ,शेअर्स यांसारखे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत असे प्रतिपादन एक्सलन्स ग्लोबल स्किल्स चे प्रशिक्षक चिराग भागडे यांनी केले.
प्रवरा कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाअंतर्गत अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, बायोटेक, अॅग्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता आयोजित केलेल्या ‘वेल्थ अवेअरनेस प्रोग्राम’ अंतर्गत प्रशिक्षणात केले. सदर प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने पार पडले. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना गुंतवणुकीची योग्य वेळ , त्याबाबतीत उपलब्ध असलेल्या विविध संधी, महागाई दर आदींबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर उपक्रमाचा समन्वय ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाकडून करण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण गोंटे,जैवतंञज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी, संस्थेचे प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मनोज परजणे,कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ.अनिल बेंद्रे, ॲग्री बायोटेक चे प्लेसमेंट समन्वयक प्रा भाऊसाहेब घोरपडे, बीएससी ऍग्री चे प्लेसमेंट समन्वयक प्रा.सुदाम वर्पे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.



