राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-येत्या ऑगस्ट महिन्यापासून आता शेतजमीन संदर्भात मोजणीचे सर्व कामकाज हे कार्यालयात न येता ऑनलाईन पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती राहाता भूमि अभिलेख चे उप अधीक्षक योगेश थोरात यांनी दिली आहे.
या अगोदर शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी च्या मोजणी साठी भूमी अभिलेख कार्यालय मध्ये वारंवार चकरा माराव्या लागत होत्या परंतु महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.त्यासाठी आता शेतकऱ्याला भूमी अभिलेख कार्यालय मध्ये चकरा मारण्याची गरज पडणार नाही व मोजनि साठी सहा सहा महिने थांब न्याची गरज पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सहजा सहजी आपले शेतीचे अचूक नकाशे मिळण्यास मदत होणार आहे.
याबाबत राहाता भूमी अभिलेख कार्यालय चे उप अधीक्षक योगेश थोरात यांनी सांगितले की शेतकऱ्याला आता जर आपल्या शेत जमिनीची मोजणी करायची असेल तर त्या शेतकऱ्याने कार्यालयात न येता ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे व ऑनलाईन अर्ज दाखल केल्यावर त्या शेतकऱ्याने शेतजमिनी चे मोजणी चे पैसे बँकेत न जाता ऑनलाईन पद्धतीने भरून शेतकऱ्याला तात्काळ मोबाईल वर आपल्या शेतीची मोजणीची तारीख sms द्वारे कळवली जाईल व पुढील 15 दिवसाच्या आत सदरील जमिनीची मोजणी पूर्ण होऊन संबंधित शेतकऱ्याला आपल्या शेतजमिनी चा अचूक नकाशा कार्यालयात न येता ऑनलाईन डाउनलोड करून प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली आहे.
उपग्रहाद्वारे मोजणी करून मोजणी नकाशा मध्ये QR कोड च्या मदतीने अक्षाश व रेखाश उपलब्ध करून दिले जाणार आहेत.तसेच मा महसूल मंत्री यांचे सूचनेनुसार कार्यालयात 5 नवीन कर्मचारी यांची भरती झाली असून मोजणी साठी खाजगी कंपनी ची मदत घेऊन कमीत कमी वेळेत अचूक मोजणी करनेवर भर दिला जात आहे.शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोजणी साठी होणारी ससे होलपट थांबणार असून या योजनेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.



