spot_img
spot_img

मनोज जरांगे पाटील यांची राहाता येथील सभेची तयारी जोरात

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-अंतरवली जिल्हा जालना येथील  रहिवाशी असलेले व मागे १५  दिवस उपोषण केलेले श्री मनोज जरांगे  पाटील यांची दिनांक ८  ऑक्टोबर रोजी राहाता येथील वीरभद्र मंदिर प्रांगणात दुपारी १२ वाजता जाहीर सभा होणार आहे.

यासाठी सकल मराठा समाज एकवटला असून सदरील सभा यशस्वी होणे साठी सर्व समाज तण मन धनाने कामाला लागला आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये श्री मनोज जरांगे  पाटील यांचा दौरा सुरू आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी जरांगे  पाटील यांनी सरकारला ४०  दिवसाचा अलतिमेटम दिलेला आहे तसेच दी १५  ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे १००  एकर जागेवर जरांगे  पाटील यांनी भव्य सभेचे आयोजन केले आहे त्याचीच जनजागृती मराठा समाजामध्ये करणे साठी जरांगे  पाटील हे वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत आहे दि 8 ऑक्टोबर रोजी राहाता येथे होणाऱ्या सभेसाठी सकल मराठा समाज राहाता तालुका पक्षीय भेदाभेद विसरून सर्व एकत्र आले असून या सभेचे गावोगावी मोठं मोठे फ्लेक्स लावून जनजागृती केली जात आहे तसेच सदरील सभा यशस्वी करणे साठी सर्व समाज प्रयत्न करत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!