लोणी दि.५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालय लोणी येथील अंतिम वर्षात शिकत असलेल्या कृषिकन्यांचा माध्यमातून रब्बी हंगामातील पिकांची लागवड पूर्व तयारी याविषयी चर्चासत्राचे नांदुर बुद्रुक येथे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रास बायर क्राॅप सायन्सचे शुभम कडलग यांनी रब्बी पिकातील लागवड पद्धती तसेच रोग ,कीड व खत नियंत्रण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी शेतकरी अनिल भदे,अमोल भदे, राजेंद्र गलांडे,रामहरी गोरे, विजय भदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे, डाॅ. रमेश जाधव , डॉ. दीपाली तांबे , डाॅ. विक्रम अनाप,प्रा.सुदाम वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या त्रिवेणी खर्डे, चेतना जाधव, प्रतीक्षा नागवडे, तेजस भोंडवे आणि दिशा भालेराव यांनी प्रयत्न केले.




Total Users : 625422