नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा तालुक्यातील गेवराई गावामध्ये घरात घुसून घरातील सुमारे 9 लाख 60 हजार रुपयांची रोकड, दागिने घेऊन तिघे चोर मोटरसायकलवर फरार होण्याची घटना घडली आहे.
सदरची माहिती अशी आहे की, शिवाजी तुकाराम रातरकर ( वय 53, राहणार गेवराई तालुका नेवासा ) यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता एक अनोळखी इसमाने आपल्या घरात प्रवेश करून घरातील सहा लाख रुपयांची रोख रक्कम व तीन लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन सदर चोर पळून जात असताना फिर्यादीबरोबर त्यांची झटापट झालेली आहे. फिर्यादी यांनी या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता गेवराई ते कुकाणा रोड ने हा चोर पळाला. व पुढे एका मोटरसायकलवर बसलेल्या दोघांबरोबर मोटरसायकलवर बसून येतील ही चोर फरार झाले.



