spot_img
spot_img

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकीच्या ५ कोर्सेसला एनबीए मानांकन ग्रामीण भागातील प्रवरेचे महाविद्यालय मानांकनात प्रथम

लोणी दि.५( जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाला एकाच वेळेस इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनीरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंग, सिव्हील इंजिनीरिंग, केमिकल इंजिनीरिंग व कॉम्पुटर इंजिनीरिंग या ५ कोर्सेसला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडेशनचे (एनबीए) मानांकन मिळाले आहे. याचा विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नौकरीसाठी तसेच विदेशातील पुढील शिक्षणासाठी मोठा फायदा होणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.

याबाबत डाॅ.गुल्हाने यांनी सांगितले की, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत एनबीएच्या पथकाने ही तपासणी केली होती. तपासादरम्यान पथकातील सदस्यांनी महाविद्यालयात असलेल्या सुविधा, शैक्षणिक दर्जा, उपलब्ध प्रयोगशाळा, महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रम या सर्वांचे गुणावलोकन करण्यात आले तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी, एम्प्लॉयर आणि विद्यार्थ्यांच्या पालकांशी सवांद साधून महाविद्यालयाचे पूर्णतः अवलोकन करण्यात आले त्यानंतरच टीम सदस्यांच्या गुणावरून एनबीए मुख्य कार्यालयाच्या मान्यतेनंतर एनबीए मानांकन देण्यात आले. त्यांनी पुढे सांगितले की, एनबीए अॅक्रिडेशन म्हणजे हे उच्च शिक्षण अभ्यासक्रम ऑफर करणार्‍या महाविद्यालयांसाठी गुणवत्तेचे प्रमाणपत्र आहे. महाविद्यालयांना त्यांच्या दर्जेदार कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. एनबीए अंतर्गत, एआयसीटीईच्या मानदंड आणि मानकांची पूर्तता करत असल्याची पडताळणी करण्यासाठी कोर्सेसचे सूक्ष्मपणे मूल्यांकन केले जाते.

यावेळी महाविद्यालायचे एनबीए समन्वयक डॉ. चंद्रकांत कडू यांनी सांगितले की, ही मान्यता केवळ अपवादात्मक सेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत नाही तर आमच्या कामाच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्न करण्याची प्रेरणा देखील देते. एनबीए नामांकन हे महाविद्यालयाशी निगडित असलेल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण मूल्य आहे, कारण ती आमच्या भागधारकांसाठी विश्वास आणि विश्वासार्हतेची खूण आहे.

एनबीए मान्यता अंतर्गत, एआयसीटीईच्या मानदंड आणि मानकांची पूर्तता करत असल्याची पडताळणी करण्यासाठी पाहिजे असलेल्या सर्व बाबींची माहितीसाठी संबंधित विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच आयक्यूएसी समन्वयक डॉ. मिलिंद म्हस्के व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास नाना तांबे,प्रवरा बॅकेचे अध्यक्ष डाॅ.भास्करराव खर्डे सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे यांनी सर्व विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी महाविद्यालयाच्या या यशाबद्दल अभिनंदन केले.

संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या यशाबद्दल सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, संस्थेची संशोधन आणि विविध उपक्रमातील समर्पित वृत्ती ही यश मिळविण्यासाठी खूप उपयुक्त ठरली आहे. या यशाने संस्थेची जबाबदारी आणखी वाढल्याचे सांगून यांचा फायदा हा ग्रामीण मुलांना होईल

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!