राहुरी शहर प्रतिनिधी १९( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहुरी,नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील राहुरी व पाथर्डी तालुक्यातील विविध रस्त्याचे कामासाठी १४कोटी ७०लाख रुपयाचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी दिली.
रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पात 14 कोटी 70 लाखांची तरतूद-आ.तनपुरे ; मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा
राहुरी मतदार संघातील अत्यंत महत्वाच्या विविध रस्त्याचे कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार मतदार संघातील राहुरी तालुक्यातील रस्त्यासाठी ५कोटी ५० रुपये मंजूर करण्यात आले असून त्यात प्र. रा. मा.८ ते कोळेवाडी ते रा. मा.५२ रस्ता (प्रजिमा १८०)किमी ५.३०० ते १०.५०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,२कोटी रुपये, वांबोरी कुक्कडवेढे उंबरे, केंदळ, मानोरी रस्ता (प्रजिमा १५६ ) किमी ०.०० ते ७.०० रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे २ कोटी रुपये, रा मा.५२ ते घोडेगाव ,मोरे चिंचोरे ,कात्रड रस्ता (प्रजिमा ३५ )किमी ११.३०० ते ११.८००,११.८००,११.९००ते १३.९००,१४.४०० ते १४.९००रस्ता मजबुतीकरण, व डांबरीकरण करणे १.५० कोटी रुपये एकूण ५.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर घाटशिरस, देवराई, त्रिभुवनवाडी, लोहसर, मिरी, आडगाव रस्ता (प्रजिमा १६३)किमी १०.०० ते २०.०० रस्त्याची सुधारणा करणे.२कोटी रुपये, मोहोज ते चिंचोडी रस्ता ( प्रजिमा ४५) किमी ३५.०० ते ४१.२०० रस्ता सुधारणा करणे १कोटी २० लाख रुपये, खोसपुरी ,शिराळ ,चिंचोडी ,करंजी रस्ता (प्रजिमा ४४) किमी १८.०० ते २२.०० रस्ता सुधारणा करणे २कोटी रुपये, वृद्धेश्वर, घाटशिरस, देवराई, त्रिभुवनवाडी, लोहसर, मिरी, आडगाव (प्रजिमा १६३)किमी ०.०० ते ५.०० सुधारणा करणे २ कोटी रुपये, पांढरीचा पूल, मिरी, शेवगाव रस्ता ( रामा ५२)किमी २३.०० ते ३३.००-रस्ता सुधारणा करणे २ कोटी रुपये असे एकूण ९कोटी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.राहुरी नगर पाथर्डी मतदार संघासाठी पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी दिली.



