कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा) :- कोल्हार भगवतीपूर येथे यापूर्वी अॅक्सीडेंट, दात व हाडांचा दवाखाना नव्हता. डॉ. पारधे माऊली हॉस्पिटल अॅक्सीडेंट, डेंटल व ऑर्थोपेडिक केअर सेंटरमुळे आता रुग्णांची गैरसोय दूर होऊन एकाच ठिकाणी या सर्व उपचाराची उत्तम सोय झाल्याचे प्रतिपादन बालरोग तज्ञ डॉ. सुनील खर्डे यांनी केले.
कोल्हार येथे लक्ष्मीबाई कुंकूलोळ कॉम्प्लेक्समधील डॉ. पारधे माऊली हॉस्पिटल अॅक्सीडेंट, डेंटल व ऑर्थोपेडिक केअर सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हाडांचे व दातांचे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या शुभारंभप्रसंगी डॉ. खर्डे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रसंगी या हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राहुल पारधे, डेंटल सर्जन डॉ. सौ. रोहिणी घोरपडे – पारधे, प्रवरा बँकेचे माजी उपाध्यक्ष अशोक असावा, डॉ. अशोक लोढा, नारायण पारधे, सोमनाथ घोरपडे, श्री. बांगर आदि उपस्थित होते.
डॉ. सुनील खर्डे म्हणाले, अवघ्या एका वर्षात डॉ. पारधे यांनी उत्तुंग झेप घेतली असून लवकरच नवीन जागेत मोठ्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया आता कोल्हारमध्येच करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. डॉ. राहुल पारधे यांनी वर्षभरात कोल्हारमध्ये खुबा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया, पायाच्या, गुडघ्याच्या, मनगटाच्या मोडलेल्या हाडांच्या बऱ्याच शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या आहेत.
काल सोमवारी प्रथम वर्धापन दिनानिमित्त येथे आयोजित हाडांचे व दातांचे मोफत तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १०८ रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये हाडासंदर्भात ८३ तर दातांसाठी २५ लाभार्थ्यांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला. कोल्हार, भगवतीपूर, तिसगाव, प्रवरानगर, चिंचोली, संक्रापूर, राहुरी, पाथरे बुद्रुक, सोनगाव, सात्रळ, फत्याबाद, कुरणपूर, गळनिंब तसेच परिसरातील अनेक गावातून आलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.



