spot_img
spot_img

कायदा व सुव्यवस्थेचे पालन स्वतःपासुन करावे -पो.नि.प्रदिप देशमुख संजीवनी ज्यु. कॉलेजमध्ये रूबी जुबली वर्षानिमित्ताने विध्यार्थ्यांना मार्गदर्शन

कोपरगांव( जनता आवाज वृत्तसेवा ):- दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची आचार संहिता पाळली तर यशस्वी जीवन जगण्यास अडचण निर्माण होत नाही. विध्यार्थ्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासुनच कायदा व सुव्यवस्थेचे पालन स्वतः पासुनच करावे, म्हणजे सद्य परीस्थिती आणि भविष्यातही कोणतीही समस्या निर्माण होत नाही, अन्यथा आपले करीअर बरबाद होवु शकते, असे प्रतिपादन कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री प्रदिप देशमुख यांनी केले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या स्थापनेस ४० वर्षे झाली असुन २०२३-२४ हे वर्ष ‘रूबी जुबली’ वर्ष म्हणुन साजरे करण्यात येत आहे. या अनुषंगाने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्था विध्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित आहेत. याच उक्रमांतर्गत संजीवनी ज्युनियर कॉलेजच्या वतीने विध्यार्थ्यांसाठी ‘कायदा व सुव्यवस्था’ विषयावर व्याख्यान आयोजीत केले होते. या कार्यक्रमात श्री देशमुख प्रमुख व्याख्याते म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोपरगांव षहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री महेश येसेकर आणि प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री देशमुख पुढे म्हणाले की अनेक तरूण वेगाने वाहन चालवुन स्टंटबाजीचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा परीस्थितीमध्ये ते पकडले गेले किंवा अपघात झाला आणि त्यांच्याकडे वाहन परवानाही नाही आणि वय वर्षे १८ ही पुर्ण नाही, अशा परीस्थितीमध्ये पालकांनाच जबाबदार धरण्यात येते. आपल्या स्टंटबाजीमुळे निरपराध व्यक्तींचा जीव धोक्यात येवु शकतो. फेसबुक, इन्स्टाग्राम चे काही लोक बनावट अकौंट तयार करून इतरांना फसवितात किंवा एखाद्याची बदनामी करण्यासाठी वापर करतात. असे कोणी करूच नये कारण अशा प्रकारच्या सायबर क्राईम मध्ये कधीना कधी पकडल्या जातेच.

उपनिरीक्षक श्री येसेकर म्हणाले की सोशल मीडिया (समाज माध्यम) मध्ये आजची तरूणाई गुरफटली असुन तंत्रज्ञानाचे फायदे असले तरी तसे तोटेही आहेत. आपण सोशल मीडियाच्या किती आहारी जायचे, हे आपण आपल्या सत्सक विवेक बुध्दीने ठरविले पाहीजे. विध्यार्थी अवस्था ही भविष्यात आपले करीअर घडविण्यासाठीचा सुवर्णकाळ असतो. चांगला अभ्यास करून अनेक विध्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता व विद्वत्ता सिध्द करून सरकारी नोकरीस पात्र होतात. अशा उमेदवारांच्या नेमणुकीच्या अगोदर पोलीस व्हेरीफिकेशन होते. जर अशा उमेदवाराची पोलीस दप्तरी गुन्ह्याची नोंद असेल तर त्याला नोकरी मिळू शकत नाही. म्हणुन आपण भविष्यात कोणत्याही गुन्ह्यात गुन्ह्याात अडकणार नाही, याची काळजी घ्यावी असे श्री येसेकर शेवटी म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!