12.7 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

रविवार पासून कोपरगावात प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने“जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव – सौ. पुष्पाताई काळे वणी गडावरून सप्तशृंगीच्या पादुका येणार कोपरगावात

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा):-प्रियदर्शनी  इंदिरा महिला मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी रविवार (दि.१६) ते शुक्रवार (दि.२४ ऑक्टोबर) पर्यंत कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

मागील अनेक वर्षापासून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दोन वर्ष वैश्विक कोरोना महामारीमुळे जरी महिलांना एकत्रित येवून हा उत्सव साजरा करता आला नाही तरी देखील हा नवरात्र उत्सव ऑनलाईन पद्धतीने (डिजिटल नवरात्र उत्सव) साजरा करण्यात आला होता. त्या उत्सवाला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून दरवर्षी महिला भगिनींना नवरात्र उत्सवाची ओढ लागलेली असते. त्यामुळे रविवार (दि.१५) पासून सुरु होणारा नवरात्र उत्सव देखील दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यावर्षी अनेक महिलांना आवडणाऱ्या अनेक नवीन स्पर्धा व उपक्रमांचा कार्यक्रमामध्ये समावेश केला असल्याचे सौ. पुष्पाताई काळे यांनी सांगितले आहे.

या नवरात्र उत्सवानिमित्त महिला भगिनींसाठी योग स्वास्थ्य शिबीर तसेच अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या देवीच्या विविध दागिन्यांची स्पर्धा तसेच महिलांचा सर्वात आवडता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत कोण होणार स्मार्ट गृहिणी यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या माध्यमातून महिला भगिनींना पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच यावर्षी नव्याने गायन स्पर्धा, बेस्ट मेकअप आर्टिस्ट स्पर्धा, फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवस कुंकुमआर्चन, देवीचे पाठ, भजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तरी सदर कार्यक्रमांचा महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी केले आहे.

भाविकांना सप्तश्रुंगी देवीच्या पावन पादुकांच्या दर्शनाचा होणार लाभ

यावर्षी नवरात्र उत्सवानिमित्त असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नासिक जिल्ह्यातील वणी गडावरील आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या पावन पादुका वणी गडावरून कोपरगावमध्ये आणण्यात येणार आहे. या पादुकांची सोमवार (दि.१६) रोजी सायंकाळी ४.०० वाजता जब्रेश्वर मंदिर ते कृष्णाई मंगल कार्यालयापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून भाविकांना दर्शनासाठी या पादुका कृष्णाई मंगल कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. या भक्तीमय सोहळ्यात भाविकांनी सहभागी होवून आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या पावन पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.-सौ. पुष्पाताई काळे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!