spot_img
spot_img

एकरुखे येथील माता वज्रेश्वरीच्या शारदीय नवराञ उत्सवास ऊद्या पासुन सुरवात

एकरूखे ( जनता आवाज वृत्तसेवा) :राहाता तालुक्यातील एकरूखे गावचे आराध्य दैवत असलेले माता वज्रेश्वरी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव रविवार दि १५ ते मंगळवार दि २४ या काळात संपन्न होत आहे, या कालावधीत विविध प्रकारचे धार्मिक , सांस्कृतिक,किर्तन महोत्सव, दांडिया स्पर्धा,भारूड,भक्तीगीत आदींसह कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

मंदिरसह परिसरात आकर्षण रोषणाई करण्यात आली आहे, या उत्सवाची जय्यत तयारी समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ ,नवरात्र महोत्सव कमिटी तसेच श्रीराम व वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष नवनाथ कार्ले यांनी माध्यमाशी बोलताना माहीती दिली.

गणेश परिसरातील लाखो भाविक श्रध्दास्थान असलेले एकरूखे गावचे आराध्य दैवत माता वज्रेश्वरी देवीची पुरातन एकमेव मंदिर आसुन भाविकांच्या हाकेला धावनारी व नवसाला पावणारी अशी ख्याती या देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव रविवार दि १५ ऑक्टो पासुन सुरू होणार आहे, या दरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ आरती व प्रसाद वाटप,सकाळी ९ ते १० वेळात देवीभागवत पारायण व सायंकाळ ६ ते ७ आरती हा दैनंदिन कार्यक्रम असणार आहे ,घटस्थापना दुपारी ४ वा राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के व महंत स्वामी रामानंदगिरीजी महाराज (मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा) याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

रात्री ७ते ९ वेळात महंत रामानंदगिरीजी महाराज याचे जाहीर हरी किर्तन व तद्नंतर महाप्रसाद सोमवार दि १६ रोजी रात्री ७ ते ९ वेळात भागवताचार्य ह भ प प्रतिक्षाताई जाधव (गिरमकर) याचे जाहीर हरि किर्तन व तद्नंतर महाप्रसाद मंगळवार दि १७ रोजी रात्री ७ ते ९ वेळात ह भ प माऊली महाराज जाधव याचे जाहीर हरी किर्तन व तद्नंतर महाप्रसाद बुधवार दि १८ रात्री ७ ते ९ वेळात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरुखे व लिटल बर्ड्स प्रि- स्कुल याचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे गुरूवार दि १९ रात्री ७ ते ९ वेळात. भव्य दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

यात राज्यातील नामांकित संघ सहभाग घेणार आहेत शुक्रवार दि २० रोजी रात्री ७ ते ९ वेळात शिवचरित्रकार युवा किर्तनकार ह भ प दिपालीताई खिळे याचे जाहीर हरी किर्तन व तद्नंतर महाप्रसाद. शनिवार दि २१ रोजी रात्री ७ ते ९ वेळात प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विघालय राहाता याचा संगीत संध्या व भक्तीगीताचा कार्यक्रम होणार आहे .रविवार २२ रोजी सकाळी ९ वा श्री क्षेत्र कालीकामाता ( पश्चिम बंगाल) येथून पायी आणलेल्या मशाल ज्योतीचे आगमन राहाता तालुक्यात होणार असून त्या निमित्ताने ज्योत घेऊ न येणार्या श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकाचे भव्य मिरवणुक द्वारे स्वागत व सत्कार समारंभ एकरुखेत खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील व वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के याच्या हस्ते होणार आहेत.

तद्नंतर दुपारी ठिक ३ वा पायी आणलेल्या मशाल ज्योतच्या सहाय्याने होमहवन प्रज्वलित केला जाणार आहेत. रात्री ७ ते ९ वा महंत उध्दव महाराज मंडलिक संस्थापक वरद विनायक सेवाधाम लोणी संस्थापक याचे जाहीर हरी किर्तन तद्नंतर महाप्रसाद व रात्री ९ वा राजुबाबा डोळस याचा जागरणाचा कार्यक्रम. सोमवार दि २३ रोजी रात्री ७ ते ९ भारुडाचार्य ह भ प बालाजी महाराज शिरसाठ सांप्रदायिक बहुरुपी सोंगी भारूडाचा कार्यक्रम सादर होणार आहेत. मंगळवार दि २४ रोजी रात्री ८ वा विजयादशमी ( दसरा) कार्यक्रमाची सांगता व एकरूखे गावातील बिरोबा मंदिर येथे व्हईकाचा कार्यक्रम होऊन सांगता होणार आहे. या काळात दररोज सायंकाळ ६ च्या आरती साठी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्रशासकीय अधिकारी , डॉक्टर, पोलीस प्रशासन, सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक ,उद्योजक, वृतपत्र संपादक ,पत्रकार बांधव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या नवरात्र महोत्सव दरम्यान साजरे होणारे कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहात कार्यक्रमाची शोभावाढवावी असे आवाहन श्रीराम व वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट, नवरात्र महोत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ एकरूखे यांच्या वतीने करण्यात आले आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!