माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):-श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव (भवानीवाडगांव) येथील ग्रामदैवत भवानीदेवी मंदिर समोर सालाबादप्रमाणे या ४८ व्या नवरात्र शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन मोहत्सव सोहळा आज १५ सप्टेंबर रोजी प्रारंभ होत आहे.
दररोज सकाळी ७ ते १० विकास महाराज बनसोडे यांच्या अधिपत्याखाली ज्ञानेश्वरी पारायण वाचन होणार आहे.
सायंकाळी हरिपाठ नंतर ७ वाजता देवी मंदिरात महाआरती, रात्री ८ ते १० किर्तने पार पडणार आहेत. रविवार दि. १५ रोजी गुरूदेव महाराज आळंदीकर, सोमवार दि. १६ स्वामी अरूणनाथगिरी महाराज श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान, मंगळवार दि. १७ आचार्य शुभम महाराज कांडेकर, बुधवार दि.१८ वाणीभूषण अनिल महाराज पाटील बार्शी, गुरूवार दि. १९ महंत उध्दव महाराज मंडलिक नेवासा, शुक्रवार दि. २० एकनाथ महाराज चत्तरशास्त्री आळंदी, शनिवार दि. २१ विलास महाराज गेजगे गंगाखेड, रविवार दि. २२ छगन महाराज खडके सोमवार दि.२३ स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थान, विजयादशमी मंगळवार दि. २४ रोजी सकाळी १० वाजता धर्मभूषण रामकृष्ण महाराज सानप सत्यगांव (येवला) यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आव्हान भजनी मंडळ व समस्थ ग्रामस्थ माळवाडगाव यांच्याकडून करण्यात आले आहे



