spot_img
spot_img

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक  यांना मनी लॉन्ड्रीन  प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.


 अंमलबजावणी संचालनालय ( ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. फरारी गँगस्टर दाऊद इब्राहिम व त्यांच्या साथीदारांमधील कथित  संबंधाचा प्रकरणात ईडी फेब्रुवारी 2022 मध्ये   नवाब मलिक यांना अटक केली होती. नवा मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

किडनीच्या आजाराने त्रस्त असून इतर अनेक आजार असल्याची सांगितले जाते. त्यांना वैद्यकीय आधारावर न्यायालयाला जामीन मागितला होता. परंतु न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्या एक सदस्य न्यायपिठाने वैद्यकीय कारणास्तव जामीन लागणारी मालिक यांची याचिका फेटाळून लावली. यानंतर मलिक यांचे वकील अमित देसाई  यांनी सांगितले की, मलिक यांची प्रकृती गेल्या आठ महिन्यापासून खालवत आहे. त्यांना किडनीचा आजार हा 2 ते 3 स्टेजवर आहेत . त्यामुळे आम्ही न्यायला परत विनंती करणार आहोत.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!