लोणी दि.१६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-विविध राष्ट्र ,भाषा ,प्रांत यामधील वाचन साहित्य ज्यांच्या वापरामुळे अनेक महान व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली त्याच व्यक्तिमत्त्वांनी राष्ट्र व समाज उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे असंख्य पुस्तके आहेत की जी आपल्या जगण्याला दिशा देतात आणि माणूस म्हणून घडवतात .आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे ही वस्तुस्थिती आहे तंत्रज्ञाचा नावाचा वापर ही आपली अपरिहार्यता असली तरी वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे वाचन चळवळ समृद्ध करणे ही आपली जबाबदारी आहे वाचनामुळे माणूस समृद्ध होतो याकरता वाचन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले पाहिजे ,सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी वाचन चळवळ व्यापक गरजेचे असे प्रतिपादन पायरेन्सचे संचालक डॉ. निलेश बनकर यांनी केले भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त पायरेन्स आय बी एम ए मध्ये वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य हे युवकांसाठी प्रेरणादायी राहिलेले आहे त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून दिसत आहे वाचनामुळे व्यक्ती सुसंस्कृत होतो व्यक्तिमत्त्वाच्या विकासाबरोबर त्याच्यामध्ये प्रगल्भता निर्माण होते त्यामुळे नियमित वाचन गरजेचे आहे असे पायरेन्स आयबीएम चे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय औताडे यांनी केले याप्रसंगी पायरेन्स आय बी एम ए मधील डॉ. मनोजकुमार लंगोटे डॉ. सतीश बिडकर प्रा. प्रमोद बोऱ्हाडे प्रा .सौरभ दिघे प्रा. ऋषिकेश धर्माधिकारी प्रा. योगेश आहेर प्रा. निलेश आवारी प्रा. धनंजय बोऱ्हाडे प्रा. रेणुका तनपुरे प्रा. रणीता वलवे प्रा. पुजा परजणे प्रा. प्रमोद गोपाळे प्रा. प्रशांत गोर्डे कार्यालयीन अधीक्षक रावसाहेब कानडे याचबरोबर पायरेन्स आय बी एम ए मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि एम बी ए, एमसीए, बी व्होक या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते



