कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ):- कोल्हार भगवतीपुर येथे दि. १६/१०/२३ ते २४/१०/२३ या दरम्यान भगवती माता देवालय ट्रस्ट कोल्हार भगवतीपुर व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गा सप्तशती पाठ, श्री स्वामी समर्थ जप, नवार्ण मंत्र जप , महामृत्युंजय जप या प्रकारचे उच्चकोटी सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या काळात मानवी जीवन संकटांनी ग्रासलेले आहे त्यामुळे भविष्य अंधकारमय बनले आहे अलीकडच्या काळात कोरोना सारखी महामारी, अपुऱ्या स्वरूपाचे पर्जन्यमान असे अनेक प्रकारचे संकट येत आहे. यातून मुक्ती मिळण्याचे व सर्व मंगलमय घडविण्याचे सामर्थ्य फक्त आदिशक्ती भगवती माता करू शकते. यासाठी या सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील ५१ शक्तिपीठ पैकी साडेतीन शक्तीपीठ हे महाराष्ट्रात आहे. या साडेतीन शक्तीपीठ पैकी एक शक्तिपीठ म्हणजे भगवती मातेचे मंदिर आहे. त्यामुळे आपल्यावर येणारे संकटे हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे यासाठी सर्वजण एकत्र येऊन माणुसकी सक्रिय करण्याची नितांत गरज आहे. म्हणून भक्ती व शक्ती ही एकत्र करून दुर्गा सप्तशती पाठ व स्वामी सेवेचे पाठ याचे आयोजन करण्यात आले.
मंदिरात दररोज सकाळी १०:३० ते १२ वाजेपर्यंत दुर्गा सप्तशती पाठ, मंत्र व जप याचे पठण केले जाते. यावेळी कोल्हार व भगवतीपुर या परिसरातील ३०० च्या आसपास महिलांनी दुर्गा सप्तशती पठनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.
यावेळी कोल्हारभगवतीपुर ट्रस्ट विश्वस्त मंडळ व सर्व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय डेंगळे पा., विजय खर्डे पा. गणेश सोमवंशी पा. विकी पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले



