लोणी दि.१८( जनता आवाज वृत्तसेवा ):-कोणतेही क्षेत्र असो त्यामध्ये आपले सर्वोत्तम देऊन स्वतःला सिद्ध करा यशाची द्वारे आपोआपच खुले होतील. आयुष्यात मनाप्रमाणे सर्व काही मिळेल असे शक्य नाही त्यामुळे वेगळा विचार करण्याचे धाडस आणि नवीन मार्गावर चालण्याचे साहस अंगी बाळगा असे प्रतिपादन लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या डाॅ.सुष्मिता विखे पाटील यांनी केले.
पायरेन्स आयबीएमए मध्ये एम बी ए, एमसीए व बी व्होक. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरता आयोजित “प्रारंभ २०२३” स्वागत समारंभ कार्यक्रमाच्या डाॅ.विखे पाटील बोलत होत्या.
संवाद साधतांना डाॅ.विखे पाटील म्हणाल्या, कठीण परिश्रम घेतल्याशिवाय हवी ती उंची गाठू शकत नाही . ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यशाच्या वाटा आपोआप मिळत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत प्रवरा समूहाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले आहे विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कायमच विद्यार्थी हितास प्राधान्य दिले आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवरा समूह सदैव तत्पर राहील असे सांगितले.
प्रवरेने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आज जगभरात अनेक उच्च पदावर प्रवरेचे विद्यार्थी कार्यरत आहेत संस्थेकरता ही अभिमानास्पद बाब आहे आहे असे शालेय शिक्षण संचालक सौ. लीलावती सरोदे यांनी सांगून विद्यार्थ्याचे प्रवरेत स्वागत केले.
आय बी एम ए चे संचालक डॉ. मोहसिन तांबोळी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व कार्यक्रमाच्या आयोजना मागील भूमिका विशद केली.पायरेन्स चे संचालक डॉ. निलेश बनकर आय. बी. एम. ए चे डॉ. मनोजकुमार लंगोटे ,डॉ. सतीश बिडकर प्रा. प्रमोद बोऱ्हाडे प्रा .सौरभ दिघे प्रा. ऋषिकेश धर्माधिकारी प्रा. योगेश आहेर प्रा. निलेश आवारी प्रा. धनंजय बोऱ्हाडे प्रा. रेणुका तनपुरे प्रा. रणीता वलवे प्रा. पुजा परजणे प्रा. संजय औताडे प्रा. प्रमोद गोपाळे प्रा. प्रशांत गोर्डे कार्यालयीन अधीक्षक रावसाहेब कानडे याचबरोबर आय. बी .एम .ए .मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि एम बी ए, एमसीए व बी व्होक या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते



