राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):- शिर्डी येथील साईबाबा संस्थान संचलित सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मधील एम आर आय विभागातील कर्मचाऱ्यांची अरेरावी ची घटना आज शिर्डी येथे घडली एक राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याला या आरेरावीची सामना आज करावा लागला.
साई संस्थान चे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे कायम या ना त्या कारणाने कायम चर्चेत असते परंतु आज एक मोठ्या राजकीय पक्षांचा पदाधिकारी हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये एम आर आई साठी गेला असता हॉस्पिटल मधील एम आर आई विभागातील कर्मचारी यांने त्या पदाधिकारी याचे सोबत अरे रावीची भाषा करून तेथून काढून दिले सदरील पदाधिकार्याला जास्त त्रास होत असल्यामुळे त्या पदाधिकार्याने एम आर आय साठी तात्काळ नंबर घ्यावा म्हणून विनंती केली.
परंतु तेथे उपस्थित असलेल्या कर्मचारी याने त्या पदाधिकाऱ्यांचे काही समजून घेतले नाही व त्यास सांगितले की तुम्ही एम आर आई साठी अगोदर तारीख घ्या व तुम्हाला जी तारीख मिळेल त्या तारखेला तुम्ही या आता एम आर आय होणार नाही तुम्हाला कुणाला फोन करायचा असेल तर तुम्ही करा आम्ही कुणाला घाबरत नाही असे सूनावुन त्या पदाधिकार्याला तेथून रवाना केले याबाबत सदरील पदाधिकार्याने सदरील कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे म्हणून साई संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पि शिवशंकर,मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस,जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करून सदरील कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी केली आहे.
या अगोदर सुद्धा साई संस्थान च्या सुपर हॉस्पिटल मधील काही विभागातील कर्मचारी हे सर्वसामान्य रुग्ण यांचे सोबत उद्धट पणे वागतात याबाबत तक्रारी या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडे आल्या असून याबाबत या अगोदर सुद्धा सदरील कर्मचारी यांचे वर कारवाई करावी म्हणून मा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे कडे पाठपुरावा सुरू आहे या कर्मचाऱ्यांना साई संस्थान प्रशासनाने वेळीच आवर घालणे गरजेचे आहे
(जितेंद्र जाधव-उत्तर नगर जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष)



