नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा ):- तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुवार दि. १३ जुलै आषाढी वद्य एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे , मुख्याधिकारी अधिकारी अंबादास गरकळ यांनी पार्किंग च्या ठिकठिकाणी जाऊन वाहतूक कोंडी च्या दृष्टीने पाहाणी करुन नियोजन केले.
तसेच नगरपंचायतीने मंदिर परिसरा बरोबर मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर येणाऱ्या काट्या काढुन स्वच्छता करण्यात आली आहे. निर्जंतुक करणे कामी जंतूनाशक पावडर फवारणी करण्यात येणार आहे फिरते. स्वच्छतागृहा ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विविध भागात बॅरेकेटींग चे काम करण्यात येणार आहे.
विज वितरण कंपनीने यात्रा काळात विज पुरवठा खंडित न होता सुरळीत राहण्याचे नियोजन करुन फिरते पथक तयार ठेवले आहे .
तसेच बांधकाम विभागाने खडका फाटा ते नेवासा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. माऊलींच्या होणाऱ्या आषाढीवद्य वारीच्या निमित्ताने सात ते आठ लाख भाविक नेवासा शहरात येण्याची दृष्टीने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासना कडून पार्किंग व्यवस्थे मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
१) नेवासा नेवासा फाटा कडून येणारी दुचाकी वाहन पार्किंग बस स्थानक परिसर व पंचायत समिती परिसर
२) नेवासा नेवासा फाटा व खडका फाटा कडून येणारी चारचाकी वाहनांची पार्किंग बाजार समिती आवार ,
३) नेवासा श्रीरामपूर कडून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग जि. प. शाळा बुद्रुक.
४) खुपटी, निभारी, पानेगावं, मांजरी , उस्थळ दुमाला या रस्त्याने कडून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची ईदगा मैदान जवळ .
विविध ठिकाणी प्रशासकीय अधिकृत पार्किंग करण्यात आली आहे व चालकांची नेमणूक केली आहे
वाहनांचा अडथळा होणार नाही यासाठी मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था केली आहे त्यासाठी कोणीही रस्त्यांवर या दिवशी वाहने लावणार नाही या दृष्टीने सर्वांनी काळजी घ्यावी . यात्रेसाठी २ पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक ९० पोलीस पुरुष अंमलदार २०, महिला अंमलदार ,५ वाहतूक कर्मचारी १ आर. सी.पी. प्लाटुन, २५ गृहरक्षक दल जवान असा चौकाचौकात बंदोबस्त दिला जाईल बेशिस्त वाहनावर कारवाई देखील करण्यात येईल आपली वाहने पार्किंग मध्येच लावावी असे आव्हान यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी केले आहे .
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरा कडे फक्त येणाऱ्या दिंड्याना प्रवेश देण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांनी वाहतूक कोंडी व गाडी सुरक्षित राहील या दोन्ही दृष्टीने आपली वाहने अधिकृत पार्किंग ठिकाणी चं लावावी.
हं.भ.प. शिवाजी महाराज देशमुख
भाविकांच्या गाड्या सुरक्षेसाठी आपली वाहने सदरील अधिकृत पार्किंग ठिकाणी चं लावावी लाईट, केमॅरे , सुरक्षा रक्षक , सह अन्य जबाबदारी ची व्यवस्था पार्किंग मध्ये असणार आहे.
योगेश गायकवाड (अधिकृत पार्किंग चालक .)



