spot_img
spot_img

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथे खा. सुजय विखे व कर्डिले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न..

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा):-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथील मुळा प्रवरा कार्यालयात खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीत डॉ. सुजय विखे म्हणाले की,निळवंडे धरण कालव्यांचे लोकार्पण,विमानतळ इमारतीचे भूमीपूजन ,साई संस्थानच्या दर्शन काॅम्पेल्क्सचे उद्घाटन असे कार्यक्रम मोदीजींच्या उपस्थित संपन्न होणार असून या कार्यक्रमाला केद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गावपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ राहुरी तालुक्यातील हजारो नागरिकांनी घेतला असून अशा सर्व लाभार्थ्यांनी पंतप्रधानांचा हा नियोजित दौरा व्यवस्थितपणे पार पडावा या उद्देशाने कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.

प्रधानमंत्री आयुष्मान भारत, महिला बचत गट अशा विविध योजनांच्या लाभार्थींना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठीची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चोखपणे पार पाडावी अशा देखील सूचना या बैठकीत खा. सुजय विखे यांनी केल्या. या बैठकीस राहुरी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!