शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्री साईबाबा संस्थान शिर्डी संचलित सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची यंत्रणा सध्या आजारी पडल्याचे निदर्शनास येत आहे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हे रोज या नात्याकारणाने चर्चे त राहत आहे या ठिकाणी असणारे अपुरे मनुष्यबळ त्यासोबतच अपुरी साधनसामग्री यामुळे सर्वसामान्य रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामध्ये सिटीस्कॅन व एम आर आय करण्यासाठी शिर्डी परिसरासह मराठवाडा विदर्भ या ठिकाणावरून रुग्ण येत असतात परंतु वेळोवेळी येथील साधनसामुग्री ही अचानक ना दुरुस्त होते त्यामुळे रुग्णांची ससे हेलपट होत आहे तसेच या ठिकाणी काही विभागामधील कर्मचारी हे रुग्णांसोबत अरेरावीची भाषा करत असतात याबाबत सुद्धा अनेक वेळा संस्थान प्रशासनाकडे तक्रारी गेलेला आहेत परंतु यावर अद्याप काहीही निर्णय संस्था प्रशासनाकडून झालेला नाही तरी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी संस्थान प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन या ठिकाणी एमआरआय मशीनची संख्या ही वाढवण्याची गरज आहे त्यामुळे रुग्णांची ससेहोलपट होणार नाही व रुग्णांचा वेळ वाचेल.



