spot_img
spot_img

प्रवरा पब्लिक स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात

लोणी दि.१९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास आज पासून सुरुवात झाली. तीन दिवस आयोजित केलेला आहे. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे यांनी दिली.

वार्षिक क्रीडा महोत्सवाची सुरुवात प्रमुख अतिथी व प्रवरा सैनिक स्कूलचे कमांडट निवृत्त कर्नल सुधीर जोशी यांच्या शुभहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाली. यावेळी प्रवरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध संचलन करून क्रीडाध्वजास मानवंदना दिली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना खेळाचे,शिस्तीचे व व्यायामाचे महत्त्व विशद केले. तीन दिवस चालणाऱ्या या वार्षिक क्रीडा महोत्सवाची सुरुवात ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीने झाली. त्यातील विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ही क्रीडा स्पर्धा चार सदनांमधून आणि चार गटातून आयोजित केली जाते.यामध्ये १००,२०० आणि ४०० मीटर अशा धावण्याच्या शर्यती,लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, थाळी फेक, गोळा फेक,भाळाफेक इत्यादी मैदानी खेळ खेळले जातात. तसेच प्राथमिक विभागाचे विविध मनोरंजनात्मक खेळ आयोजित केले जातात. मुले आणि मुली अशा स्वतंत्र गटात क्रीडास्पर्धा घेतली जाते. त्यामुळे तीन दिवस विद्यार्थ्यांसाठी व क्रीडा प्रेमींसाठी भरभरून मनोरंजन होत असते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या सदनास जिंकून देण्यासाठी शर्थीने प्रयत्न करतो. या क्रीडा महोत्सवासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या शुभारंभ याप्रसंगी शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे, उपप्राचार्य श्री. के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम एस जगधने, सौ. शुभांगी रत्नपारखी उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन क्रीडा संचालक डि.के.जाधव आणि अफजल पटेल यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!