spot_img
spot_img

श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान बेलापुर यांच्यावतीने दुर्गा माता दौडचे आयोजन

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- नवरात्रौ उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान बेलापुर गाव यांच्या वतीने दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात येत असुन या उपक्रमामुळे गावातील वातावरण भक्तीमय झालेले आहे . श्री शिवप्रतिष्ठाण हिंंदुस्थान यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात आलेले आहे.

श्री शिवप्रतिष्ठाणचे सर्व मावळे त्यात तरुण मुले व मुली पहाटे साडेपाच वाजता गावातील शनि मंदिराजवळ एकत्र येतात तेथुन दुर्गामाता दौड सुरु होती दौडच्या अग्रभागी हिंदु ध्वज असतो मावळ्यांच्या हातात तुळजाभवानी श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच भिडे गुरुजी यांच्या प्रतिमा असतात आतिशय शिस्त बद्ध रीतीने दोन रांगातच हे मावळे पद्य गात चालत असतात. दुर्गा माता दौडचा मार्ग कोणता असेल ते आगोदर गावातील व्हाँट्सअप गृपवर टाकले जाते काही माळवे आदल्या दिवशी घरोघर जावुन दौड येणार असल्याची सुचना देतात त्यामुळे दुर्गा माता दौड येणाऱ्या मार्गावर माता भगीनी सडा टाकतात रांगोळी काढतात दुर्गा माता दौड घरासमोर आल्यावर महीला माता भगीनी हिंदु ध्वजाची मनोभावे पुजा करतात. दुर्गा दौडमधीव मावळे रस्त्याने जाताना वेगवेगळे पद्य गात जातात छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदु राष्ट्र की जय प्रभु श्री रामचंद्र की जय सीता मय्या की जय लक्ष्मण भैय्या की जय अशा घोषणांनी परीसर दणाणून जातो दसरा सणाच्या दिवशी सर्व मावळ्यांना फेटे बांधण्यात येतात.

त्या दिवशी संपुर्ण गावातुन दौड जाते शेवटी गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शस्र पुजन केले जाते महाआरती होवुन सांगता होत असुन प्रत्येक नागरीकांच्या मनात राष्ट्र प्रेम ,हिंदुत्वाची भावना जागृत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजक योगेश पवार यांनी सांगितले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!