spot_img
spot_img

कुरणपूरला तोंडावर स्प्रे मारून 15 तोळे दागिने लुटले

श्रीरामपूर (जनता आवाज

वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथील शामराव ठकचंद देठे यांच्या घरावर आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास  ७ ते ८ अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकत कपाटातील अंदाजे १५ तोळे सोन व रोख रक्कम लंपास केली आहे.

 कुरणपूर सोसायटीचे अध्यक्ष शामराव देठे हे आपल्या पत्नीसह नाशिक येथे देवदर्शन साठी गेले असता आई-वडील व मुलगा,मुलगी हे गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी आज पहाटे च्या सुमारास घरात प्रवेश केला. झोपेत  असलेल्या घरातील मंडळीच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर तिने कपाटाची लॉक तोडून अंदाजे 15 तोळे सोनं व रोख रक्कम लुटली. दरोडे ची माहिती मिळताच लोणी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

 कुरणपूर परिसरातील हा आतापर्यंत सर्वात मोठा दरोडा असून शामराव देठे हे आपल्या पत्नीसह नाशिक येथे देवदर्शनासाठी गेले आहेत आणि घरी फक्त त्यांच्या आई वडील व मुलगा मुलगीच आहे. अशी माहिती दरोडा टाकणाऱ्यांकडे  असली पाहिजे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!