संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अंकलापूर येथील वीस वर्षे अपंग तरुणीवर बळजबरी अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
अपंग असल्याचा फायदा घेत आदिवासी मुलीवर अत्याचार
संगमनेर पठार भागातील अकलापूर येथील आदिवासी वाडी वस्तीवर विवाहित व्यक्तीने घरात घुसून एका आदिवासी मुलीवर बळजबरी अत्याचार केला. सदर पीडित तरुणी लहानपणापासून एका हाताने अपंग असून ती आदिवासी समाजाची आहे. पीडित तरुणी ही सोमवारच्या दिवशी सुमारे 5:30 वाजता आपल्या राहत्या घरी ती व तिचा लहाना भाऊ घरी होते.
कारण पीडितचे आई वडील हे बाहेर असताना ते दोघेच घरी होते. त्यावेळी आरोपी सचिन ठका खंडागळे हा त्याच्या मुलासोबत आला. त्यानंतर त्यांनी पीडिता लहान भावाला आपल्या मुलासोबत खेळायला पाठवले. अशा संधीचा फायदा घेत त्याने अपंग असलेल्या केला. त्यावेळी त्या मुलीने आरोपीच्या हाताला चावा घेत सुटका करायचा प्रयत्न केला आहे. पण एका हाताने अपंग असल्यामुळे सुटका करता आली नाही.
हा सर्व प्रकार झाल्यानंतर, रात्रीच्या वेळी मुलीचे आई-वडील आले असता तिने घडलेल्या सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर आई-वडील सदर आरोपी सचिन ठका खंडागळे त्याच्या घरी जाब विचारण्यास गेल्या असता त्याने पीडताच्या आई-वडिलांना मारहाण करीत तुम्ही या प्रकारची वाचता कुठे केली तर तुम्ही कुठवर जा तुम्हाला फोडून तोडून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे पीडताचे घरचे अतिशय दडपणाखाली आले. त्यानंतर ते सर्वजण मुलीच्या मामाकडे घारगाव येथे गेले. त्यांनी हा झालेला सर्व प्रकार मुलीच्या मामाला व इतर नातेवाईकांना सांगितला.
त्यानंतर मुलीचे मामा व पीडित मुलगी, आई वडील व इतर नातेवाईक घारगाव पोलीस स्टेशन मध्ये पोलीस सहाय्यक फौजदार उमेश पतंगे यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पीडित तरुणीची फिर्यादीवरून आरोपी सचिन ठका, खंडागळे याच्याविरुद्ध ३४२/ २०२३ भा द वि 376/ 2 , 452,324,506 प्रमाणे अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 कलम 92 प्रमाणे गुन्हा नोंदवून घेतला पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन यंत्रणा करीत आहे.



