spot_img
spot_img

शेवगाव मध्ये मोसंबीच्या बागेत चक्क गाज्याची लागवड

शेवगाव ( जनता आवाज वृत्तसेवा):- मोसंबी बागेत चक्क गांजाची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शेवगाव तालुक्यातील आखतवाडे या गावात ही घटना घडली आहे. आरोपी शेतकरी चक्क १२९ झाडाची लागवड करण्यात आली होती . या प्रकाराची माहिती अशी आहे की, सदर गांजाची लागवड केली ची माहिती शेवगाव पोलिसांना मिळतात. शेवगाव पोलिसांनी शेतात छापा मारत सदर शेतकऱ्याला अटक केली आहे. सदर आरोपीचं नाव अरुण बाजीराव आठरे (44) असे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवगाव ठाण्याचे अधिकारी रेड्डी यांना आठरे यांच्या मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे लावण्याची माहिती मिळाली होती. यानंतर सदर गोष्टीची खात्री होताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सोपोनी विश्वास पवार, आशिष शेळके, पोलीस कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे, उमेश गायकवाड, सुजित सरोदे, सुनील रत्नपारखे, सचिन खेडकर,वैभव काळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रूपाली कलोर यांचे पथक तयार करून पंचा समक्ष त्याचे छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथक तहसीलदार राहुल गुरव, वजन मापे निरीक्षक अनुप कुलकर्णी, यांच्यासह दोन शासकीय पंच फोटोग्राफर यांना सोबत घेऊन आठरे यांच्या शेती गट क्रमांक १५६ मध्ये गेले असता तेथे मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे आढळून आली. सदर शेतकऱ्याने झडतीस नकार दिला असता पोलीस निरीक्षक पुजारी यांनी समज पत्र देऊन झडती घेतली .
यावेळी तब्बल 129 गांजाचे झाडे आढळून आले. या गांजाचे झाडांचे वजन केले असता ११३ किलो भरले . यानंतर पोलिसांनी ते गांजा जप्त करून पुढील कारवाईचे आदेश दिले. पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे यांच्या फिर्यादीवरून आठरे यास मुद्द्यमाला सह ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!