नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा ):-सन २०२३/ २४ च्या गळीत हंगाम तोंडावर आला असताना कारखान्याकडून दिला जाणारा उसाचा भाव पहिला हप्ता म्हणून ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने उसाला प्रति टन ३२०० रुपये प्रमाणे पहिली उचल द्यावी अशी मागणी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी कारखान्याचा बॉयलर पेटवण्यापूर्वी जाहीर करावी आशी मागणी त्यांनी कारखाना व्यवस्थापनला केली आहे.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचा २२ ऑक्टोबर रोजी कारखान्याचा ५० वा गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे चेअरमन नरेंद्र पाटील घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी ३२०० रुपये प्रति टनाप्रमाणे पहिले पेमेंट जाहीर करावे. तसेच एफ आर पी नुसार दुसरे पेमेंट जाहीर करून कारखान्याच्या उपपादार्थातून मिळणारा नफा यातूनही उसउत्पादक शेतकऱ्यांना पैसे द्यावेत.अशी मागणी करत चालू वर्षात पाऊस समाधानकारक न झाल्याने उसाची वाढ कमी प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांना मिळणारे टनेज तसेच पिकासाठी झालेला खर्च यात मोठी तफावत असणार आहे. आपण आज ३२०० रु प्रमाणे पहिले पेमेंट जाहीर केले नाही तर शेतकरी अन्य ठिकाणी ऊस देतील पर्यायाने कारखान्याला ऊस मिळणार नाही यात कारखान्याचे देखील मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे व ज्ञानेश्वर कारखान्याने संभाजीनगर व बीड जिल्ह्यातून ऊस खरेदी करू नये जेणेकरून वाहतूक व उत्पादन खर्च वाढून त्याचा परिणाम ऊस दारावरती होतो, म्हणजे ऊसउत्पादकांचे नुकसान यामुळे होते.
या व्यतिरिक्त कारखान्याने उत्पादित केलेल्या उपपदार्थातून मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग शेतकऱ्यांनाही द्यावा चालू वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत आहे दिवाळी सण तोंडावर असताना देखील शेतकऱ्यांच्या खिशात पैसे नाही तसेच चालू वर्षी राज्यातील कारखान्यांनी 3000 ते 3200 रुपये टनाप्रमाणे पहिली उचल जाहीर केलेला आहे .ज्ञानेश्वर कारखान्याने देखील कारखान्याने देखील तीन हजार दोनशे रुपये टना प्रमाणे पहिली उचल जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.



